शेअर बाजाराने पुन्हा एकदा इतिहास रचला. मंगळवारी सेन्सेक्स 80 हजारांच्या जवळपास घुटमळला. त्यानंतर त्याला पुढे झेप घेता आली नाही. पण आज बाजार उघडताच सेन्सेक्सने मोठी उसळी घेतली. बीएसई सेन्सेक्सने 481.44 अंकांच्या उसळीने लक्ष्य भेदले. सेन्सेक्स आज 79,922.89 अंकांवर उघडला होता. तो काही मिनिटांतच व्यापारी सत्रात पुन्हा एकदा 572 अंकांच्या उसळीने 80,000 टप्पा पार करुन पुढे गेला. बाजाराच्या या घौडदौडीमुळे गुंतवणकूदारांनी भांगडा केला.
- बातमी अपडेट होत आहे…