Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा...

‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यावेळी उपस्थित होते.

 

या योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेताना योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले.

 

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देताना योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगटाऐवजी २१ ते ६५ वर्षे वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीच्या जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

 

२.५ लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार कार्डजात प्रमाणपत्रमूळ निवासी प्रमाणपत्ररेशन कार्डउत्पन्नाचा दाखलाबँकेचे पासबूकमोबाईल क्रमांकपासपोर्ट साईज फोटोमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म

 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी

शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -