Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचे सभासद प्रशिक्षणासाठी रवाना

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचे सभासद प्रशिक्षणासाठी रवाना

इचलकरंजी –

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या प्रामुख्याने ऊस शेती व साखर उत्पादनाशी संबंधीत संशोधन व मार्गदर्शन करणा-या नामवंत संस्थेने 2 ते 5 जुलै या कालावधीत आयोजीत केलेल्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण शिबीराकरिता कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे 34 ऊस उत्पादक सभासद शेतकरी रवाना झाले.

शेतकर्‍यांची ऊस शेती किफायतशीर होवून उत्पादनात वाढ व्हावी व त्यामधील सातत्य टिकवण्याच्या दृष्टीने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने विविध ऊस विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शेतीची सुधारीत पध्दत व शास्त्रोक्त तंत्रज्ञानाची सखोल माहिती कारखान्याच्या सभासद शेतकर्‍यांना व्हावी यासाठी कार्यक्षेत्रामध्ये वेळोवेळी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आणि कारखान्याच्या शेती तज्ञांकडून मार्गदर्शनासाठी परिसंवादाचे आयोजन केले जाते. या अंतर्गत हे सभासद शिबीरासाठी पाठवण्यात आले आहेत.

या प्रशिक्षणार्थी सभासद शेतकरी यांना ज्येष्ठ संचालक आण्णासो गोटखिंडे यांनी मार्गदर्शन करून आधुनिक ऊस, शेती प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रशिक्षणार्थी सभासद, संचालक सुरज बेडगे, जनरल मॅनेजर (केन) किरण कांबळे, उप मुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे व मुख्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -