गेल्या महिनाभरापासून देशभरात नीट परीक्षेचा गोंधळ सुरु आहे. अशातच आता परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहे.
त्यामुळे आता नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या (नीट) पुन्हा परीक्षा होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नीट पीजी परीक्षा आता 11 ऑगस्ट 2024 रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना नीट पीजी परीक्षेचे नवीन वेळापत्रक एनबीईची वेबसाईट natboard.edu.in पाहायला मिळणार आहे.
कधी होणार कट ऑफ जाहीर?
नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या (एनईईटी) वतीने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, नीट पीजी परीक्षेचे आयोजन 11 ऑगस्टला होणार आहे. ही परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर प्रामुख्याने 15 ऑगस्ट रोजी या परीक्षेचा कट ऑफ डेट जाहीर केला जाणार आहे.
असे पहा परीक्षेचे वेळापत्रक?
– अधिकृत संकेतस्थळ http://natboard.edu.in वर जा.
– त्या ठिकाणी तुम्हाला पब्लिक नोटीस ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
– त्यानंतर तुम्हाला नीट पीजी परीक्षेसंदर्भातील पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे.
– त्यानंतर नवीन पेज उघडेल, त्यावर विद्यार्थ्यांना सूचनापत्रक पाहायला मिळेल.
पेपरफुटी प्रकरणामुळे नीट परीक्षा लांबणीवर
देशभरात पदवी स्तरावरील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट यूजी परीक्षा आयोजित केली जाते. मात्र, या परीक्षेबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठे आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. ज्यामुळे नीट परीक्षा परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. ही परीक्षा प्रामुख्याने २३ जून २०२४ रोजी होणार होती. मात्र, लगोलाग नेट परीक्षेत देखील पेपरफुटी प्रकरण समोर आले. अर्थात या दोन्ही परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे समोर आले. ज्यामुळे २३ जून २०२४ रोजी होणारी नीट परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.