Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, दोन आरोपी अटकेत

धक्कादायक! पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, दोन आरोपी अटकेत

शिवसेना नेते संदीप थापर यांच्यावर पंजाबमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

 

पंजाबच्या लुधियानामध्ये (Ludhiana) शिवसेना (Shiv Sena) नेते संदीप थापर (Sandeep Thapar) गोरा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निहंगांच्या वेशात आलेल्या 3 ते 4 हल्लेखोरांकडून धार-धार शस्त्रांनी वार करत संदीप थापर यांच्यावर हल्ला करण्यात आला. जीवघेण्या हल्ल्यामध्ये संदीप गोरा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संदीप थापर यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

 

शिवसेना नेते संदीप थापर यांच्यावर शुक्रवारी भरदिवसा तलवारीनं हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पंजाबमधील लुधियाना येथील फतेहगढ साहिब येथून पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी पंजाबमधील लुधियानामध्ये शिवसेना नेते संदीप थापर यांच्यावर चार हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात शिवसेना नेते संदीप थापर गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, संवेदना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंदर अरोरा यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलजवळील ट्रस्टच्या कार्यालयातून बाहेर आले असता संदीप थापर यांच्यावर हल्ला करण्यात आला.

 

हल्ल्याचं सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल

पंजाबच्या लुधियानामध्ये शिवसेनेचे नेते आणि शहीद सुखदेव सिंग यांचे नातेवाईक संदीप थापर गोरा यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला आहे. यामध्ये संदीप थापर गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.निहंगांच्या वेशात आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी संदीप थापर यांच्यावर धारधार शस्त्रांनी वार केले. सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरच त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. संवेदना ट्रस्टचे प्रमुख रविंदक अरोरा यांच्या पुण्यातिथी सोहळ्याचे आयोजन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते. थापर यांच्यासोबत बंदुकधारी गार्डही होते. या सोहळ्यात अरोरा यांना अभिवादन करून बाहेर येत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. 40 ते 50 लोकांसमोर हल्ला करून आरोपी संदीप यांच्या दुचाकीवर पळून गेले. संदीप यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात संदीप त्यांच्या बंदूकधारी रक्षकासोबत हॉस्पिटलबाहेर ट्रॅफिकमध्ये थांबलेले दिसत आहेत. दरम्यान, तीन निहंग सिंग आले आणि दोघांनी संदीपला पकडले तर एक जण त्यांच्या बंदूकधारीसाेबत निघून गेला. पोलिसांनी तिघा हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

भाजपच्या पंजाब युनिटचे सरचिटणीस अनिल सरीन म्हणाले की, “मान हे केवळ राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, तर त्यांच्याकडे गृहखातेही आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) सरकार आल्यापासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालली आहे.”

 

“हत्या, लुटमारीच्या घटनांमध्ये आणि गुंडांगिरीमध्ये वाढ झाली आहे. परिणामी लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पंजाब सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अशा घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.”, असंही अनिल सरीन म्हणाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -