Saturday, July 13, 2024
Homeराजकीय घडामोडीराजू शिंदेंसह तब्बल 18 जण करणार भाजपला रामराम, ठाकरे गटात करणार प्रवेश,...

राजू शिंदेंसह तब्बल 18 जण करणार भाजपला रामराम, ठाकरे गटात करणार प्रवेश, पाहा यादी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे राजू शिंदेंसह तब्बल 18 जण भाजपला सोडचिठ्ठी देणार आहे.

ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची यादी समोर

भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही पाहायला मिळाले. मात्र राजू शिंदेंनी आता या गोष्टीला उशीर झालाय असे वरिष्ठांना सांगितले होते. आता राजू शिंदेंसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.

 

राजू शिंदे हे 6 नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत काही पदाधिकारीही ठाकरे गटात सहभागी होणार आहेत. यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजू शिंदेंसह ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची नावे

1) राजू शिंदे (माजी उपमहापौर भाजप) 2) गोकुळ मलके (नगरसेवक भाजप) 3) प्रल्हाद निमगावकर (नगरसेवक भाजप) 4) अक्रम पटेल (नगरसेवक राष्ट्रवादी) 5) प्रकाश गायकवाड ( नगरसेवक अपक्ष) 6) रुपचंद वाघमारे (नगरसेवक अपक्ष) 7) सय्यद कलीम (जिल्हा परिषद सदस्य शिंदे गट) 8) सतीश पाटील (पंचायत समिती सदस्य भाजप) 9) संभाजी चौधरी (ग्रामपंचायत सदस्य भाजप) 10) वसंत प्रधान (भाजप जिल्हा उपाध्यक्ष) 11) माया पाटील ( ग्रामपंचायत सदस्य) 12) शंकर म्हात्रे (भाजप मंडळ अध्यक्ष) 13) कैलास वाणी 14) प्रवीण कुलकर्णी 15) अभिजित पवार तालुका अध्यक्ष भाजप 16) मयूर चोरडिया, 17) सौरभ शिंदे 18) आकाश पवार

 

राजू शिंदे यांची ठाकरे गटात जाण्यापूर्वीची प्रतिक्रिया

“भाजपमध्ये मंडळ अध्यक्ष हा सर्वात मोठा असतो. माझ्यासोबत पाच मंडळ अध्यक्ष आहेत. त्यासोबतच तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष आणि पश्चिम विधानसभेची भाजपची कोअर टीम ही माझ्यासोबत आहेत. हे सर्व माझ्यासोबत यायला तयार आहेत. त्यांच्यामुळेच मी हे निर्णय घ्यायला तयार झालो”, असे राजू शिंदे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -