Wednesday, October 23, 2024
Homeब्रेकिंगवीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, राज्य सरकारने केली पगारवाढीची घोषणा

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, राज्य सरकारने केली पगारवाढीची घोषणा

राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेषण संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेताला आहे. वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे. या निर्णयानुसार, राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेषण या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली.

कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्क्याने वाढ केली जाणार आहे. या निर्णयाचा लाभ कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि सहाय्यक प्रवर्गातील कामगारांना होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा करार 1 एप्रिल 2023 पासून प्रलंबित होता. या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, 7 जुलै रोजी मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गेल्या चार महिन्यापूर्वी झालेल्या एका बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचाऱ्यांना मूळ वेतनामध्ये 15 टक्के आणि भत्त्यामध्ये 100 टक्के वाढ देण्याचे सूचित केले होते. या पगारवाढमुळे कंपन्यांवर 1 हजार 435 कोटी रुपयांचा आर्थिक भार येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, कामगार संघटनांनी ही वाढ असमाधानकारक असल्याचे म्हाणत यावर मार्ग काढण्याची विनंती केली होती. परंतु, लोकसभेचा कार्यक्रम जाहीर झाला आणि आचारसंहिता सुरू झाल्याने हा प्रश्न प्रलंबित होता.

पगार वाढीच्या या प्रश्नावर त्वरीत तोडगा काढण्यासाठी तसेच पगारवाढीचा करार तात्काळ करावा याकरीता वीज कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनास नोटीस दिली होती. यासह गेल्या महिन्यात 24 ते 28 जूनदरम्यान प्रचंड द्वारसभा झाल्या. यानंतर कर्मचाऱ्यांनी येत्या 9 जुलैपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक पार पडली. या बैठकीला अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, तिन्ही वीज कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र (महावितरण), संजय कुमार (महापारेषण) व डॉ.पी. अनबलगन (महानिर्मिती), संचालक (मासं) व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पगारवाढ जाहीर केली. यासह इतर प्रलंबित विषयवार लवकरच अनामलिज कमिटी कालबद्ध कार्यक्रम ठरवून निर्णय घेणार, असे निर्देशित करण्यात आले.

अशी आहे पगारवाढ

कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांच्या मूळ वेतनामध्ये 19 टक्के वाढ करण्यात येईल. तर सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ, 3 वर्षांच्या कंत्राटी सहाय्यक कर्मचाऱ्यांना 5000 रुपये वाढ करण्यात आली. लाईनवर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त 1000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -