Sunday, September 8, 2024
Homeइचलकरंजीनृसिंहवाडी येथे 14 रोजी सामूहिक सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळ्याचे आयोजन

नृसिंहवाडी येथे 14 रोजी सामूहिक सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळ्याचे आयोजन

इचलकरंजी

दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शना खाली व नितीन भाऊ मोरे यांच्या उपस्थितीत रविवार 14 जुलै रोजी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास पालक, मुलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन इचलकरंजी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये विद्येची व बुद्धीची देवता म्हणून सरस्वती मातेस प्रथमस्थान दिले आहे. या सामूहिक सरस्वती पूजन सोहळ्यातून मुलांमध्ये भक्ती व मूल्यसंस्काराची शिकवण रुजवण्याचा विधायक हेतू या उपक्रमातून साध्य करण्यात येणार आहे. या उपक्रमात शालेय मुले, युवा-युवती आणि पालक एकत्रितपणे सामुहिक पद्धतीने सरस्वती मातेचे पूजन करणार आहेत.

दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने 18 विभागांच्या माध्यमातून विविध ज्ञान विनामूल्य जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असते. त्यासोबत बालसंस्कार विभागाच्यावतीने विविध उपक्रमातून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, पर्यावरणजनजागृती, गडकिल्ले संवर्धन अशा अनेक विषयांवर सामाजिक प्रबोधन करण्यात येते. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यासाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उभारण्यात आलेल्या या गुरुपीठाच्या वास्तूमध्ये सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकाच्या वतीने देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -