Sunday, September 8, 2024
Homeइचलकरंजीरोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या ‘सावली’ स्मरणिकेचे प्रकाशन

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या ‘सावली’ स्मरणिकेचे प्रकाशन

इचलकरंजी

मे महिन्यात संपन्न रोटरी सेंट्रल एक्झिक्यूटिव्ह प्रोबस क्लबच्या कॉन्फरन्सच्या निमिताने क्लबच्या वर्षभरातील कार्याचा आढावा तसेच विचारवंतांचे लेख, रोटरी पदाधिकार्‍यांचे संदेश आदीचा समावेश असलेल्या ‘सावली’ या स्मरणिकेचे प्रकाशन क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, प्रकाश दत्तवाडे, अजित कोईक, गजाननराव सुलतानपूरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी मागील सर्व उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख करत पुढील वर्षात घ्यावयाच्या उपक्रमांसाठी असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले, गजाननराव सुलतानपुरे यांनी, सर्व ज्येष्ठांनी एकत्र येऊन रोटरी प्रोबसच्या माध्यमातून जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटावा, असे सांगितले. या समारंभात डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट, किसान डे निमित डॉ. कुबेर मगदूम, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. ए. एन, सांगावे, डॉ. आरती कोळी, प्रगतशिल शेतकरी बसगोंडा बिरादार यांचा सत्कार अ‍ॅड. विश्‍वास चुडमुंगे, सौ. अरुंधती सातपुते, डी. एम. बिरादार, काशिनाथ जगदाळे, क्लबचे अध्यक्ष शिवबसू खोत, उपाध्यक्ष सुनील कोष्टी, सेक्रेटरी विजय पवार आदींच्या हस्ते संपन्न झाला.

प्रारंभी स्वागत शिवबसू खोत यांनी तर प्रास्ताविक रामचंद्र निमणकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन विजयकुमार हावळे यांनी केले. आभार जुगलकिशोर तिवारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या निमित्ताने जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या आणि नव्याने आलेल्या सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समारंभास जयप्रकाश शाळगांवकर, सौ. सुजाता कोईक, सौ. हेमल सुलतानपूरे, सूर्यकांत बिडकर, प्रमोदिनी देशमाने, आप्पासाहेब कुडचे, मोहन भिडे, गजानन खेतमर, हेमंत कवठे, दिलीप शेट्टी, किरण कटके, अरुण केटकाळे, सदाशिव काजवे, श्रीमती मंजुळा कांबळे, श्रीमती सुनंदा कांबळे आदी मान्यवर व सभासद उपस्थित असून होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -