Friday, October 18, 2024
Homeराजकीय घडामोडीमविआ' मध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? दिल्लीतून सर्वात मोठी बातमी समोर

मविआ’ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? दिल्लीतून सर्वात मोठी बातमी समोर

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. महाविकास आघाडीच्या अपक्षेपेक्षा जास्त जागा निवडून आल्या.

आता लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी बातमी समोर येत आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष विधानसभेची ही निवडणूक एकत्र लढणार आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस प्रत्येकी 95 ते 100 जागा लढण्याची शक्यता आहे. तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिला जाणार नाहीये, निकालानंतर मुख्यमंत्रिपद जाहीर केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील दोन पक्ष राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये जागावाटप देखील निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. आता काँग्रेसची प्रतीक्षा आहे, तर निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिला जाणार नसून, निवडणुकीनंतर त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमधील घटक पक्षांनी देखील विधानस सभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -