Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रकोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग म्हणजे किती लिटर पाणी सोडलं? 'क्युसेक'...

कोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग म्हणजे किती लिटर पाणी सोडलं? ‘क्युसेक’ चा अर्थ काय?

आज सकाळीच 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग वाढवला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणांमधील पाणीसाठा आणि विसर्ग यावर लक्ष ठेऊन असल्याचं म्हटलं आहे. मात्र दर पावसळ्यामध्ये बातम्यांमध्ये वारंवार पाहायला मिळणाऱ्या ‘इतक्या क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु’ किंवा ‘अमुक तमूक टीएमसी पाणी सोडलं’ यासारख्या वाक्यांमधील टीएमसी किंवा क्युसेक शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? एक क्युसेक म्हणजे किती पाणी? याचसंदर्भात जाणून घेऊयात…

 

क्युसेक म्हणजे किती लिटर?

 

दर पावसळ्यामध्ये ऐकायला मिळणारा क्युसेक हा शब्द वाहतं द्रव्य मोजण्यासाठी केला जातो. आता एक क्युसेक म्हणजे किती असा प्रश्न पडला असेल तर 1 क्युसेक पाणी म्हणजे दर सेकंदाला 28.32 लिटर पाणी असा होतो. म्हणजेच 2 क्युसेक पाणी सोडलं असं म्हटलं तर दर सेकंदाला 56.64 (28.32X2) लिटर पाणी सोडण्यात आलं. क्युसेक हा शब्द क्युब पर सेकेण्ड्स वरुन आला आहे. प्रत्येक सेकंदाला किती क्युब पाणी सोडलं जातं हे यामधून समजतं.

 

म्हणजेच आता कोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला याचा अर्थ लिटरमध्ये काढायचा झाला तर 28.32X32100 म्हणजेच सेकंदाला 9 लाख 9 हजार 72 लिटर पाणी धरणामधून सोडलं जात आहे.

 

टीएमसी म्हणजे किती लिटर?

 

टीएमसीचा फुलफॉर्म Thousand Million Cubic Feet असा होतो. आता एक टीएमसी पाणी म्हणजे किती असं वाचालं तर 1 टीएमसी म्हणजे 2,831 कोटी लिटर इतकं पाणी होतं. सामान्यपणे भारतामध्ये धरणांमधील पाण्याची क्षमता किंवा नदीमधून वाहणारं पाणी मोजण्यासाठी हे मोठं एकक वापरलं जातं. भारत सरकारचा केंद्रीय जल आयोगाकडून धरणांमधील पाणीसाठा मोजण्यासाठी हेच एकक वापरलं जातं. ही केंद्रीय संस्था असल्याने देशभरामध्ये धरणांमधील पाणी या एकाच एककाने मोजलं जातं. कृषी तज्ञांच्या सांगण्यानुसार एक टीएमसी पाण्यामध्ये 10 हजार एकर जमीनीला 1 वर्ष सिंचनासाठी पाणी पुरवठा करता येईल. दोन दिवसांपूर्वी कोयना धरणामधील पाणीसाठा 60.42 टीएमसी इतका होता. म्हणजेच 171049 कोटी लीटर पाणी कोयना धरणात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -