बिग बॉस मराठीतील भाऊच्या धक्क्यावर अनेकांना धक्के बसले. सर्वात मोठा धक्का जान्हवी किल्लेकरला बसला. त्यानंतर निक्की तांबोळीला धक्के बसले. नंतर अरबाज आणि अभिजीत सावंत यांचेही कान उपटण्यात आले. जान्हवीने पॅडी ऊर्फ पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केला. त्यामुळे रितेश देशमुख यांनी जान्हवीला फटकार लगावलीच. पण जान्हवीला बिग बॉसच्या घरातील तुरुंगात टाकण्याची शिक्षाही सुनावली. आतापर्यंत आपण सेफ गेम खेळतोय असं वाटणाऱ्या जान्हवीला हा मोठा धक्का होता. यावेळी हे माझं घर आहे, तुमचं घर नाही. माझ्या घरात मी काहीही खपवून घेणार नाही, असंही रितेश देशमुख यांनी जान्हवीला सुनावलं.
बिग बॉसच्या घरात जान्हवी किल्लेकरने आर्याची चादर फेकली होती. या प्रसंगाचा रितेश देशमुख यांनी उल्लेख केला आणि जान्हवीच्या वर्तवणुकीवर तिला चांगलीच फटकार लगावली. निक्कीच्या असिस्टंट आहात. मग तुम्ही आर्याची चादर का फेकली? त्यावर नाचला अन् अॅटिट्यूड देऊन म्हटला मला पाय पुसायचे होते. तुमच्या घरी तुम्ही असे पाय पुसता का? घरची चादर जमिनीवर ठेवून पाय पुसता? तुम्ही हे जर तुमच्या घरात असाल, पण इथे माझ्या घरात करू नका जान्हवी, असं रितेश देशमुख यांनी सुनावलं.
तुम्ही एवढ्यावर नाही थांबला. आर्या बेडरूमध्ये आली. तुमचा तिच्याशी वाद सुरू झाला. तुम्ही तिला धक्का मारला. तिने सुरुवात केली नव्हती. ती काही बोलली नाही. ती चादर खेचत होती. तुम्ही तिला धक्का मारला. तुम्ही तिला काय बोलला हे तुम्हाला आठवतं का? तुला फाडून टाकीन. तुला फोडून टाकेल. आणि वर कॅमेऱ्यावर येऊन बिगबॉसला म्हणाला आर्याला ट्रिटमेंटची गरज आहे. तुम्ही स्वत:चं बघा. तुम्हाला किती अँगर इश्यू आहे. तुमचा माज, दादागिरी आणि उर्मटपणा हे सर्व आज बंद होणार आहे, अशा शब्दात रितेश यांनी तिला सुनावले.
भाऊच्या धक्क्यावर स्थान नाही
तुम्ही सर्वांना म्हणताना, मी बाहेर काढीन. जान्हवी मी तुम्हाला बाहेर काढतो. उभं राहा. प्लीज स्टँड अप, प्लीज. दरवाजा उघडा. जान्हवी, आजनंतर या भाऊच्या धक्क्यावर, माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्ही रिपेटेड ऑफेन्डर आहात. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही या कलाकारांबरोबर बसणं डिसर्व्ह करत नाही. मी तुम्हाला जागा दाखवतो. असं बोलू नये. तु्म्ही आजपासून एक आठवडा जेलमध्ये राहणार. इथेच राह्यचं, इथेच खायचं. इथेच झोपायचं. आज उद्या भाऊचा धक्का होईल. त्यात तुम्हाला जागा नाही. जोपर्यंत तुमचं डोकं ठिकाणावर येत नाही, तोपर्यंत तुम्ही जेलमध्येच राहायचं, अशी शिक्षाच त्यांनी जान्हवीला सुनावली.