मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ल्यात शिवरायांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला होता. पण अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या या प्रकरणात दोन व्यक्तींविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे. ठेकेदार आणि आर्टिसरी कंपनीचे मालक जयदीप आपटे तसच स्ट्रक्चरल कंसल्टेंट डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. जयदीप आपटे कल्याण येथे राहतात तर डॉक्टर चेतन पाटील कोल्हापुर येथे राहतात. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत 109, 110, 125 आणि 318 (3) (5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुतळा कोसळण्याच्या या प्रकरणात सहाय्यक इंजीनियर आणि पीडब्ल्यूडी अधिकारी अजित पाटिल यांनी सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौदलाने उभारला होता. हा पुतळा नौदलाच्या अख्त्यारित होता. भारतीय नौदलाने आता या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. नौदलाकडून चौकशी करण्याबरोबरच पुतळा तातडीने उभारण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत. लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल. नौदल दिनी 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची आज नौदलाचे अधिकारी पाहणी करतील.
मंत्री दीपक केसरकर आणि काँग्रेस नेते संदेश पाटील देखील आज राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुरावस्थेबद्दल नौदलाला 20 ऑगस्ट रोजी पत्र दिलं होतं, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाने केलाय.
FIR मध्ये काय म्हटलय?
या घटनेनंतर ठेकेदार आणि आर्टिसरी कंपनीचे मालक जयदीप पाटील यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण कॉल-मेसेजला प्रतिसाद मिळाला नाही तसच या घटनेनंतर कल्याण येथील त्यांच्या निवासस्थानी टाळं आहे. पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी 20 ऑगस्ट रोजी जयदीप आपटे यांना एक ई मेल पाठवला होता. यात त्यांनी नट बोल्ट गंजल्याची माहिती दिली होती. पुतळ्याला धोका आहे याचा इशारा दिला होता. मात्र तरीही पावल उचलण्यात आली नाही असं FIR मध्ये म्हटलं आहे.