Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाटी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने आगामी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर हीच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व आहे. तर सांगलीकर स्मृती मनधाना ही उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच श्रेयांका पाटील आणि विकेटकीपर बॅट्समन यास्तिका भाटीया या दोघांचाही समावेश मुख्य संघात करण्यात आला आहे. मात्र या दोघी दुखापतग्रस्त आहेत. दोघीही दुखापतीतून सावरत आहेत. मुख्य स्पर्धेआधी या दोघी पूर्णपणे फीट झाल्या तरच यांना वर्ल्ड कपसाठी खेळता येईल, अन्यथा दोघांच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली जाईल. त्यामुळे या दोघींसमोर स्वत:ला फिट करण्याचं आव्हान असणार आहे.

 

टीम इंडियाचं वर्ल्ड कप वेळापत्रक

विरुद्ध न्यूझीलंड, 4 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई

 

विरुद्ध पाकिस्तान, 6 ऑक्टोबर, दुपारी 3.30, दुबई

 

विरुद्ध श्रीलंका, 9 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, दुबई

 

विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 13 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.30 वाजता, शारजाह

 

टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृति मनधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर)*, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील* आणि सजना सजीवन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -