Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रइमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू

इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू

मुंबईतील दिंडोशीमधील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर काही मजूर गंभीर जखमी झाले आहेत. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे

 

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम या ठिकाणी असलेल्या गोविंद नगर भागात अनेक इमारतींचे बांधकाम सुरु आहे. यातील बांधकाम सुरु असलेल्या नवजीवन इमारतीचा स्लॅब आज दुपारी १२.३० च्या सुमारास कोसळला. ही इमारत झोपडपट्टी पुनर्वसनातंर्गत बांधली जात आहे. ही इमारत Gr + 20 अशा स्वरुपाची आहे. या इमारतीच्या 20 व्या मजल्याचे काम सुरु होते. या 20 व्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु असताना अचानक हा स्लॅब कोसळला.

 

नवजीवन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 4 कामगार जखमी झाले आहेत. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एका कामगारावर मालाडमधील देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून हा स्लॅब हटवला जात आहे. तर दुसरीकडे पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

नवी मुंबईतील स्लॅब कोसळला

दरम्यान काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईतील कोपरखैराणे या ठिकाणच्या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला होता. या इमारतीत 70 कुटुंब वास्तव्यास होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या या इमारतीतील रहिवाशांना मदत शिबीरात पर्यायी व्यवस्था देण्यात आली आहे.

 

विक्रोळीत स्लॅब कोसळून तीन जणांचा मृत्यू

तर दुसरीकडे विक्रोळी पश्चिम भागातील टाटा पॉवर हाऊसजवळील कैलास बिझनेस पार्कमधील पाच मजली बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला होता. यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये 10 वर्षातील एका लहान मुलाचा समावेश होता. नागेश रामचंद्र रेड्डी (38) आणि रोहित रेड्डी (10) अशी मृतांची नावे होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -