Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात झिका व्हायरसच्या रुग्णात वाढ, मुंबई, पुण्यासह कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

राज्यात झिका व्हायरसच्या रुग्णात वाढ, मुंबई, पुण्यासह कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

पावसाळा सुरु झाला की अनेक आजार डोकं वर काढतात. सध्या राज्यात कोरोना, डेंग्यू, मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता झिका विषाणूंच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राज्यात गेल्या आठवड्याभरापासून झिका विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आता झिका विषाणूंचे महाराष्ट्रात किती रुग्ण याची आकडेवारी समोर आली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 128 झिका रुग्णांची नोंद झाली आहेत. यात सर्वाधिक झिकाचे रुग्ण हे पुणे महापालिका हद्दीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

 

महाराष्ट्रात झिका आजाराच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. सुदैवाने मुंबईत अजून एकाही रुग्णाला झिका विषाणूची लागण झालेली नाही. तर पुणे महापालिका हद्दीत 91, पुणे ग्रामीणमध्ये 9, पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत 6, अहमदनगर (संगमनेर) मध्ये 11, सांगली (मिरज) मध्ये 1, कोल्हापूरमध्ये 1, सोलापूरमध्ये 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्क राहा, असे आवाहन केले आहे.

 

पुण्यात झिका विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकड़ून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग हा सर्व रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. गर्भवती महिलांना या विषाणूचा जास्त प्रमाणात धोका संभवतो. गर्भवती महिलांच्या गर्भावर या विषाणूचा परिणाम होऊ शकतो. यामुळे बाळाच्या डोक्यात जन्मजात दोष किंवा इतर समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

 

झिका म्हणजे काय?

झिका हा एक विषाणू असून तो डासांपासून पसरतो. 1947 मध्ये युगांडाच्या झिका जंगलात तो प्रथम आढळला होता. 2015 मध्ये अमेरिकेत, विशेषतः ब्राझीलमध्ये लक्षणीय उद्रेक झाल्यानंतर या विषाणूने जागतिक पातळीवर सर्वांचे लक्ष वेधले. हा उद्रेक मायक्रोसेफली (Microcephaly) या आजारासह जन्मलेल्या बाळांच्या वाढीशी संबंधित होता. मायक्रोसेफली हा एक गंभीर जन्मदोष आहे; ज्यामध्ये लहान मुलाचे डोके असामान्यपणे लहान असते आणि मेंदू अविकसित असतो. त्यावरून हे सिद्ध झाले, “गर्भवती महिलांना या विषाणूचा जास्त धोका असतो आणि त्यांच्या बाळावरही त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.”

 

झिका विषाणू पसरविणारे डास घरामध्ये आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी आढळू शकतात. जरी हे डास सहसा दिवसाच्या वेळी चावत असले तरी रात्रीच्या वेळीही ते चावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Previous article
Next article
आयुष्यमान भारत योजनेविषयी मोठी अपडेट; आता कुटुंबातील इतक्या लोकांना मिळणार आरोग्य सुविधा, सरकारने केला मोठा बदल आयुष्यमान भारत योजना जनतेला मोफत आरोग्य सेवा-सुविधा देणारी योजना आहे. मोदी सरकारने 2018 मध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू केली होती. या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा मिळतात. सरकार प्रत्येक नागरिकामागे इतका खर्च करते. आतापर्यंत योजनेतंर्गत 34 कोटींहून अधिक आयुष्यमान कार्ड तयार करण्यात आले आहे. सरकारने बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत योजनेत मोठा बदल केला आहे. कॅबिनेट बैठकीत 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान योजनेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 34 कोटींहून अधिक आयुष्यमान कार्ड सरकारी आकडेवारीनुसार, आयुष्यमान भारत योजनेतंर्गत आयुष्यमान कार्डच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 30 जून 2024 रोजीपर्यंत हा आकडा 34.7 कोटींहून अधिक झाला आहे. या कालावधीपर्यंत एक लाख कोटी रुपयापर्यंतच्या 7.37 कोटी रुग्णांच्या खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. या योजनेतंर्गत देशभरातली 29 हजारांहून अधिक सूचीबद्ध रुग्णालयात कॅशलेस आणि पेपरलेस आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. देशातील 6 कोटी ज्येष्ठांसाठी मोठा निर्णय आयुष्यमान भारत योजनेविषयी केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. देशातील 4.5 कोटी कुटुंबातील 6 कोटी ज्येष्ठांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवा मोफत देण्यात येतील. सध्या ज्येष्ठ नागरीक या योजने व्यतिरिक्त सरकारच्या इतर आरोग्य सेवेचा फायदा घेत असेल तर त्यांचा या योजनेत आपोआप समावेश होईल. एका कुटुंबात किती जणांना कार्ड? सरकारने 2018 मध्ये आयुष्यमान भारत योजना आणली. नागरिकांना मोफत आरोग्य सेवा आणि सुविधा मिळण्यासाठी ही योजना आणली आहे. कुटुंबातील किती जणांसाठी आयुष्यमान कार्ड तयार केले जाऊ शकते? किती जणांना योजनेचा फायदा होतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर याविषयीची कोणतीही मर्यादा सरकारने घालून दिलेली नाही. कुटुंबातील कितीही सदस्यांना आयुष्यमान कार्ड तयार करता येते. असे तयार करा आयुष्यमान कार्ड तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर टोल फ्री क्रमांक 14555 वर कॉल करू शकता. त्यावरून तुम्हाला योजनेसंबंधी आणि पात्रतेसंबंधीची माहिती मिळेल. अथवा तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन कागदपत्रांसह अर्ज करू शकता. अर्ज करताना आधार कार्ड, निवासी पुरावा, राशन कार्ड याशिवाय एक नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -