शाहूवाडी (shahuwadi) तालुक्यातील निनाई परळे येथे किरकोळ कारणातून सासऱ्याची जावयाने हत्त्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. कडवी पाटबंधारे प्रकल्पाच्या परिसरातील ओढ्याच्या पत्रात दगडांखाली आरोपीने लपविलेला मृतदेह शाहूवाडी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधून काढला.
राजू निकम (वय ४६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नांव असून याप्रकरणी पोलिसांनी निकम याचा जावई लहू निकम याच्या विरोधात रात्री उशिरा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र घटनेनंतर संशयित पसार झाला आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही खुनाची घटना घडली असल्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले






