Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगभीषण अपघातातून बचावल्यानंतर रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांची भावनिक प्रतिक्रिया

भीषण अपघातातून बचावल्यानंतर रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांची भावनिक प्रतिक्रिया

भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा आज भीषण अपघात घडला. ही अपघाताची घटना चाळीसगावात धुळे-सोलापूर मार्गावर घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली होती. पण सुदैवाने संजना जाधव आणि गाडीचा ड्रायव्हर हे दोन्ही या अपघातात सुखरुप बचावले आहेत. संजना जाधव यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघातात संजना जाधव यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे. एका पिकअपने त्यांच्या गाडीला धडक दिल्याने ही अपघाताची घटना घडली. पिकअप चालक हा मद्यधुंद असल्याने ही अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर संजना जाधव यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी घडलेली सर्व घटना सांगितली.

“खरं म्हटलं तर काळजी घेणारे एवढे लोक आहेत, त्यामुळे आम्ही आज सुखरुप आहोत. मला नाही वाटत की, हा निवडणुकीचा काळ आहे. या निवडणुकीच्या काळातच मी फिरत आहे. तर इतरही वेळी सर्वसामान्यांपर्यंत जात असते. गेल्या 21 वर्षापासून मी तालुक्यात नागरिकांच्या सुख-दुःखात फिरत आहे. पण आज हा योग माझ्यावर येणारच असेल. तो आला. माझे सर्व हितचिंतक मला भेटायला आले. सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने आज मी सुखरूप आहे”, अशी भावनिक प्रतिक्रिया संजना जाधव यांनी दिली.

 

अपघाताची घटना नेमकी कशी घडली?

“माझ्या मतदारसंघातील वलठाण येथे जात असताना अपघात झाला. समोरून पिकअप आला. पिकअप चालक अतिशय नशेत होता. त्याने नशेत असताना समोरून येऊन माझ्या गाडीला धडक दिली. अशाप्रकारे त्या ठिकाणी हा अपघात घडला. तिथे रस्त्याचे काम सुरू असल्याने तिथली वाहतूक एका बाजूने वळवण्यात आलेली होती. आम्ही आमच्या बाजूने होतो. पिकअप चालक नशेत असल्यामुळे त्याला सुचले नाही की, गाडी राईटला घेतली पाहिजे की लेफ्टला. त्याने सरळ आमच्या गाडीवर गाडी घातली”, अशी आपबीती संजना जाधव यांनी सांगितली.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी मदतीला आल्या’

“पिकअप चालकाला आम्ही खाली उतरवून बोललो. पण तो नशेत असल्यामुळे त्याला काहीही सुचले नाही. पिकअप चालक नशेत असल्यामुळे हा अपघात घडला. तो नंतर आम्हाला विचारतो की, काय झालं म्हणून? तो नशेत असल्यामुळे हा सगळा प्रकार घडला”, असं संजना जाधव म्हणाल्या. “अपघातानंतर घटनास्थळी पोलीस तातडीने आले. सर्वांनी सहकार्य केलं. आमदार मंगेश चव्हाण यांनाही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला घटनास्थळी पाठवले. त्यांचीही मला त्या ठिकाणी मदत मिळाली. काळजी घेणारे एवढे लोक माझ्यासोबत असल्याने आज मी सुखरूप आहे”, असं संजना जाधव म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -