केंद्र सरकारने १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंतच्या तिमाहीसाठी लघुबचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. पीपीएफवर ७.१ टक्के दरानेच व्याज दिले जाणार आहे.
वित्त मंत्रालयाकडून जारी प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली.
सध्या सर्वाधिक व्याज सुकन्या समृद्धी योजना व ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर दिले आहे. या योजनांमध्ये ८.२ टक्के इतके व्याज दिले जात आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर ७.७ टक्के दराने व्याज दिले जात आहे. सरकारने ३१ डिसेंबर २०२३ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाहीसाठी काही लघु बचत योजनांचे व्याज वाढवण्याची घोषणा केली असली तरी आवर्त ठेव वगळल्यास कोणत्याही दरात बदल केलेला नव्हता.
विविध लघुबचत योजनांमध्ये किती दराने व्याज?
योजना व्याजदर
बचत ठेव ४%
मुदत ठेव – १ वर्ष ६.९%
मुदत ठेव – २ वर्षे ७%
मुदत ठेव – ३ वर्षे ७.१%
मुदत ठेव – ५ वर्षे ७.५%
आवर्त ठेव – ५ वर्षे ६.७%
ज्येष्ठ नागरिक बचत ८.२%
मासिक उत्पन्न योजना ७.४%
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ७.७%
पब्लिक प्रॉविडंड फंड ७.१%
किसान विकास पत्र (११५ महिन्यांतर परिपक्व होणार) ७.५%
सुकन्या समृद्धी योजना ८.२%