Sunday, February 22, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी : 'त्या' मारहाणप्रकरणी चौघांना अटक

इचलकरंजी : ‘त्या’ मारहाणप्रकरणी चौघांना अटक

गणपती आगमनावेळी झालेल्या वादाचा राग मनात धरून झालेल्या मारहाणप्रकरणी चार जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.

 

शुभम सोपान वळे (वय २७), यासीन अकबर मुल्ला (वय ३२), पिंटु उर्फ धनाजी पांडुरंग जाधव वय ३२ (सर्व रा. कारंडे मळा, शहापूर), अवनिश चंद्रकांत हरसुरे (वय २३ रा. सोळगे मळा, शहापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

 

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार गंभीर दुखापत असल्याने संशयितांना आज अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तारदाळ नाका येथील अन्नपूर्णा हॉटेलसमोर विशाल आण्णाप्पा ढवळे (वय ३३ रा. शहापूर), तेजस शिवाजी पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सिमेंटच्या विटांनी डोक्यात मारून जखमी केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -