Thursday, November 21, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : अनैतिक संबंधातूनखूनातील तिघा संशयितांना कोठडी

इचलकरंजी : अनैतिक संबंधातूनखूनातील तिघा संशयितांना कोठडी

भगवानदास रावत याचा खून करणाऱ्या अल्पवयीन चौघांसह ७ जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून तिघांना कोठडी सुनावली.

 

अनैतिक संबंधातून सुनिलकुमार भगवानदास रावत याचा खून करणाऱ्या अल्पवयीन चौघांसह ७ जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

 

याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुष्पराज रामसिंह गाडे (वय २१), संतोषकुमार जोगेश्वर सिंह (वय १९) आणि शिवेंद्र रामकुशन सिंह (वय १९) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान अल्पवयीन चौघांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

सुनिलकुमार रावत याचा रविवारी गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तारदाळ (ता. हातकणंगले) हद्दीतील रेल्वे रुळावर टाकला होता. मृतदेहावरुन रेल्वे गेल्याने दोन तुकडे झाले होते. या घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दोन पथके तयार करुन ओळख पटवली. तो वास्तव्यास असलेल्या ठिकाणी चौकशी केली असता त्याच परिसरातील पुष्पराज गाडे याच्याशी रावत याचा वाद झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुष्पराज गाडे, संतोषकुमार सिंह व शिवेंद्र सिंह यांच्यासह ४ अल्पवयीन अशा ७ जणांना जयसिंगपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -