Saturday, January 24, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी : पुष्पराज बोराणे यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून किमती ऐवज लंपास

इचलकरंजी : पुष्पराज बोराणे यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून किमती ऐवज लंपास

बंद घराचे कुलूप उचकटून सोन्याचे मनी मंगळसुत्र, सोन्याचे ३५ मनी, मंगळसुत्राच्या दोन सोन्याच्या वाट्या, मोबाईल असा ५७ हजाराचा ऐवज लंपास झाल्याची घटना शहापूर येथे घडली.

 

याप्रकरणी पुष्पराज धोंडीराम बोराणे (वय ५७, रा. शहापूर) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

शहापूरमधील महात्मा फुले सोसायटीत राहणारे पुष्पराज बोराणे आणि त्यांचे कुटुंबिय ४ नोव्हेंबरला घराला कुलूप लावून तारदाळमधील नातेवाईक प्रदीप चंद्रकांत नगरकर यांच्याकडे गेले होते.

 

मंगळवारी सकाळी बोराण कुटूंबीय घरी परत आले असता घराचे कुलूप उचकटल्याचे दिसून आले. बोराणे यांनी घरात पाहणी केली असता बेडरुममधील लाकडी कपाटाच्या लॉकरमधील ३० हजाराचे मनी मंगळसुत्र, २५ हजाराचे सोन्याचे ३५ मनी, मंगळसुत्राच्या २ सोन्याच्या वाट्या आणि २ हजाराचा मोबाईल असा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बोराणे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चोरीची नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -