Saturday, December 21, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : महापालिकेचा लिपिक निलंबित

इचलकरंजी : महापालिकेचा लिपिक निलंबित

कर्तव्यात कसूर केल्याने मतदान केंद्र क्रमांक २५२ मधील मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) तथा महानगरपालिका लिपिक सुर्यकांत वाडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

 

मतदान केंद्र क्रमांक २५२ करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून सुर्यकांत वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

 

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून वाडकर आपली कर्तव्ये व जबाबदारी पार पाडत नसल्याने प्रत्यक्ष निवडणूक कामकाजामध्ये अडथळा आल्याचे निदर्शनास आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी, इचलकरंजी विधानसभा मतदार संघ यांच्या प्रस्तावानुसार सुर्यकांत वाडकर यांना कारणे दाखवा नोटीस लागू करण्यात आलेली होती. सदर कारणे दाखवा नोटीसीला वाडकर यांनी समाधान कारक उत्तर दिलेले नाही. सुर्यकांत वाडकर यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ मधील तरतूदीचा भंग केला आहे. या गैरकसुरीबाबत वाडकर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील शिस्तभंगाचे कारवाईस पात्र असल्याने त्यांना महानगरपालिका सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -