Thursday, November 21, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : कचरा व्यवस्थापन मक्तेदाराची विभागीय चौकशी करा: उमाकांत दाभोळे 

इचलकरंजी : कचरा व्यवस्थापन मक्तेदाराची विभागीय चौकशी करा: उमाकांत दाभोळे 

इचलकरंजी शहरातील कचरा उठाव झाला नसल्यामुळे कचऱ्याने पेट घेतल्याने परिसरातील नागरिकांच्या प्रसंगावधानतेमुळे शहरात मोठा अनर्थ टळला आहे.

 

मक्तेदाराकडे कचरा उठावासंबंधित व्यवस्था नसताना कोणत्या धर्तीवर मक्ता दिला याची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी उमाकांत दाभोळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनात, शहरातील कचरा उठाव नियमितपणे होत नाही. घंटागाडी एक दिवसआड येते. संबंधित मक्तेदाराकडून शहरातील कचरा उठाव व घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे ओला, सुका कचरा गोळा करण्याचा ठेका घेतला आहे.

 

मक्तेदाराकडे कचरा उठाव करण्याची क्षमता दिसत नाही. गेल्या महिन्यापासून त्यांना मक्ता दिला आहे. तेव्हा पासून शहरातील कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. कोणत्या आधारावर मक्ता दिला, कागदपत्रे यंत्रणा दाखवेल काय? संबंधित मक्तेदार व व्यवस्थापन करणाऱ्यांची विभागीय चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, असे म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री सचिवालय, उपमुख्यमंत्री सचिवालय, खास. धैर्यशील माने, आम. प्रकाश आवाडे, माजी आम. सुरेश हाळवणकर यांना देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -