Sunday, September 8, 2024
Homeकोल्हापूरतीन पानी जुगारावर छापा ; 48 जणांवर गुन्हा, लाखोंचा माल हस्तगत

तीन पानी जुगारावर छापा ; 48 जणांवर गुन्हा, लाखोंचा माल हस्तगत



जयसिंगपूर येथील गल्ली क्रमांक 10 मध्ये कलश क्रीडा, कला, संस्कृतिक मंडळाच्या नावाखाली तीन पानी जुगारावर छापा टाकण्यात आला. यात 48 जणांच्यावर कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी रविवार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास केली. तर पहिल्याच दिवशी हजर झालेले पो.नि. मस्के यांनी मोठी कारवाई केल्याने अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील मध्यवस्तीत गल्ली क्रमांक 10 येथे अरूण पांडूरंग परूळेकर यांच्या मालकीच्या चंद्रहिरा अपार्टमेंटमध्ये कारवाई केली.

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत जुगार खेळत असलेल्या ठिकाणी मद्यपानही सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

पदभार स्विकारताच पोलिस निरीक्षकांची कारवाई
यानुसार नुतन पोलिस निरीक्षक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व गुन्हेशोध पथकाने तीन पानी जुगारावर छापा टाकत संयुक्त कारवाई केली.

या कारवाईत 1 चारचाकी, 6 मोटरसायकली, 39 मोबाईल संच, 17 टेबल, 60 खुर्चासह रोख रक्कम 97 हजार 620 रूपये असा एकुण 17 लाख 6 हजार 920 रूपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या कारवाईत अरविंद चव्हाण, रशिद शेख, राजेंद्र हरकळ, अनिल लोंढे, नागेश राठोड, नागेश गाडीवडर, हणमंत दौडमनी, सलिम शेख, नितीन पवार, किशोर लोकरे, दत्ता शिकलगार, रसुल नदाफ (सर्व रा.जयसिंगपूर) प्रमोद साखरे, राजू जाधव, नाखिल जमादार, भरत चव्हाण, विजय डोईफोडे, सागर गायकवाड, सुरेश शेडशाळ, संगाप्पा दौडमनी, दिलीप लोंणकर, अजित शेरखाने, इम्तीयाज बागवान, बालेखान अपराध, प्रदीप धवल (सर्व रा.इचलकरंजी).

रमेश पुजारी (रा.चंदूर), मनोज पाटील (रा.यड्राव), मालोजी वरक (रा.मौजे आगर), मधुकर चौगुले, भैरू शालबिद्रे, प्रविण कटगुळी (रा.कबनूर), सुनिल रामचंद्र संकपाळ, अशोक शेट्टी, अशोक शेडशाळे, सुरेश दामलखत्री, प्रशांत मोहिते (रा.सांगली), अमोल मगदूम (रा.उमळवाड), सुनिल पाटील (रा.अंकली) अजय चव्हाण (रा.कुरूंदवाड),

राजेंद्र मगदूम, राहूल गायकवाड (रा.उदगांव), उत्तम देवमाने, आनंदा कोळी (रा.शिरोळ), इकबाल शेख (रा.हेरवाड), जयपाल नरंदे (रा.धरणगुत्ती),

जमील अत्तार (रा.बोरगांव कर्नाटक), महेबूब शेख (रा.मिरज) अशी ताब्यात घेवून गुन्हे दाखल करण्यात आली आहे.

हि कारवाई पो.ना.स्मिता कांबळे, आनंदा बंडगर, पो.कॉ.अभिजित भातमारे, रोहित डावाळे, संदेश शेटे, शशिकांत भोसले, मंगेश पाटील, विजय पाटील, प्रविण जाधव, जावेद पठाण,

वैभव सुर्यवंशी, पल्लवी चव्हाण यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांच्या पथकाने केली. याबाबतची फिर्याद पो.कॉ.अमोल अवघडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -