Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरतिसर्‍या लाटेचा धोका पाहूनच महाविद्यालयांचा निर्णय: मंत्री उदय सामंत

तिसर्‍या लाटेचा धोका पाहूनच महाविद्यालयांचा निर्णय: मंत्री उदय सामंत



मंत्री उदय सामंत म्हणाले, महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक होते. परंतु संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता महाविद्यालये सुरू करण्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ज्यावेळेस तिसर्‍या लाटेसंदर्भातील सर्व संभ—म दूर होतील, त्यावेळीच महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी ‘पुढारी’शी संवाद साधला यावेळी त्यांनी महाविद्यालये.

मंत्री उदय सामंत म्हणाले, विविध जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी, कुलगुरूंसमवेत महाविद्यालये सुरू करण्याबाबत चर्चा झाली आहे. जिल्हाधिकारी याबाबत सकारात्मक आहेत. महाविद्यालये सुरू करावी लागणार आहेत. मात्र कोरोनाची स्थितीही विचारात घ्यावी लागेल. केरळमध्ये सध्या कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. ही तिसर्‍या लाटेची सुरुवात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने खबरदारी घेण्याची सूचना राज्यांना केली आहे. यामुळे संभाव्य तिसर्‍या लाटेची स्थिती पाहून पुढील पाऊल टाकावे लागणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

मागच्या वेळेस महाविद्यालये सुरू करण्याचे जाहीर केल्यानंतर 15 दिवसांनंतर दुसरी लाट आली. त्यामुळे ती सुरू करता आली नाहीत. त्यामुळे यावेळी अधिक सावधगिरी बाळगावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सीईटी परीक्षेची तारीख उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे चार-पाच वेळा वाढविली आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सीईटी देता यावी यासाठीदेखील मुदत वाढविली गेली आहे. सध्या सीईटीची मुदत वाढवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली नाही. परंतु मुदत वाढविण्याची मागणी केल्यास विद्यार्थी हिताचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -