Thursday, January 30, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : महिलांची फसवणूक : एकावर गुन्हा

इचलकरंजी : महिलांची फसवणूक : एकावर गुन्हा

सीएमईजीपी योजनेतून प्रोजेक्ट लोन मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवत महिला बचत गटातील ८ महिलांची ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन विठ्ठल धनवडे (वय ४८ रा. निमशिरगाव ता. शिरोळ) याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी सपना सुभाष पोवार (वय ३६ रा. कामगार चाळ) यांनी फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी सपना पोवार यांच्यासह काही महिलांचा बचत गट आहे. त्यामध्ये सुनिता अरविंद जाधव, शालन अनिल हजारे, चैत्राली स्वप्निल मगदूम, अनिता अनिल हांजी, महादेव शिवगोंडा पाटील, स्वाती शिवाजी मोहिते, मनिषा सचिन पारळे व नंदीनी पंडीत पारळे यांच्यासह बजरंग केरबा लोकरे आणि प्रभाकर मारुती पाटील यांना सीएमईजीपी योजनेतून प्रोजेक्ट लोन करुन देण्याचे व मंगल विष्णु चव्हाण यांना बचत

 

गटाचे लोन करुन देतो असे नितीन धनवडे बाने सांगितले. लोन मंजूरीसाठी धनवडे याने जुलै २०२४ पासून १८ जानेवारी २०२५ पर्यंत प्रोसेसिंग फी च्या नांवाखाली ऑनलाईनने २ लाख ९ हजार ५०० आणि रोखीने ५ लाख ८८ हजार ५०० रुपये असे ७ लाख ९८ हजार रुपये घेतले.

 

परंतु सीएमईजीपी योजना अथवा बचत गटाचे लोन न करता फसवणूक केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -