इचलकरंजीत थकबाकीपोटी बँकेने सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून तेथे बेकायदेशीररित्या प्रवेश करत कब्जा केल्याप्रकरणी पती व पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबु इराप्पा कारदगे (वय ६५) व सावित्री बाबु कारदगे (दोघे रा. आयकर कॉलनी मागे) व अन्य एक महिला अशी त्यांची नांवे आहेत. या प्रकरणी बँकेच्या वतीने लक्ष्मण गणपती कोळेकर (वय ५४ मोठे तळे) यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे.
बाबु कारदगे व सावित्री कारदगे यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेकडून कर्ज घेतले आहे. पण त्या कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तारण मिळकत सील केली होती.
या सील मिळकतीचे कुलूप तोडून कारदगे यांनी बेकायदेशीरपणे प्रवेश करत कब्जा केल्याप्रकरणी बँकेच्या वतीने कारदगे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.