Monday, March 3, 2025
Homeमहाराष्ट्रTiger Shroff साठी निर्मात्यांचे सरप्राईज, Baaghi 4 चे जबरदस्त पोस्टर रिलीज

Tiger Shroff साठी निर्मात्यांचे सरप्राईज, Baaghi 4 चे जबरदस्त पोस्टर रिलीज

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ने आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे त्याचे ॲक्शनपट प्रेक्षकांच्या पसंतीस नेहमीच उतरले आहेत. २ मार्चला त्याचा वाढदिवस झाला.

 

त्याने आपला ३५ वा वाढदिवस साजरा केला. या खास औचित्याने चित्रपट निर्मात्यांनी आगामी चित्रपट बागी ४ (Baaghi 4) चे पोस्टर रिलीज केलं.

 

फॅन्सना मिळाले सरप्राईज

 

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये संतापजनक अंदाजात दिसत आहे. यावेळीही त्याचा जबरदस्त ॲक्शनपट असणार आहे, असे पोस्टरवरून दिसते. या पोस्टरमध्ये त्याचा रक्ताने माखलेला चेहरा दिसतोय. तो सिगारेट ओढताना दिसत आहे.

 

प्रोडक्शन हाउस, नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंटने इन्स्टाग्रामवर ‘बागी ४’ चे पोस्टर रिलीज केले आहे. ‘हॅप्पी बर्थडे टायगर श्रॉफ तुम्हाला ॲक्शनने भरपूर वर्षाच्या शुभेच्छा, रॉनी.’

 

बागी ४ मध्ये एक्ट्रेस सोनम बाजवा शिवाय आणि एक अभिनेत्री दिसणार अल्याचे म्हटले जात आहे. पण ती अभिनेत्री नेमकी कोण आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबरला रिलीज केली जाईल, असे म्हटले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -