Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रपुढील 5 दिवस मुसळधार पाऊस, 5 जिल्ह्यांना बसणार तडाखा, हवामान खात्याकडून मोठा...

पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस, 5 जिल्ह्यांना बसणार तडाखा, हवामान खात्याकडून मोठा अलर्ट

वातावरणामध्ये सातत्यानं मोठा बदल होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरात कडाक्याची थंडी पडली होती, मात्र आता उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. आता वातावरणाबाबत आयएमडीकडून पुन्हा एकदा मोठी अपडेट देण्यात आली आहे.

 

पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, आयएमडीकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

पुढील पाच दिवस हिमाचल प्रदेश आणि आसपासच्या प्रदेशात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पावसासोबतच जोरदार बर्फवृष्टी देखील होऊ शकते असं आयएमडीनं म्हटलं आहे.

 

आजपासून राज्यात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

9 मार्च रोजी लाहौल-स्पिती, किन्नौर आणि चंबा तसेच कांगडा आणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यात आता हळू-हळू उन्हाचा कडाका वाढू लागला आहे, थंडी पूर्णपणे गायब झाली असून, उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.

 

 

राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नसून, वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -