दारु पिताना मित्रांमध्ये सुरु असलेला वाद सोडविण्यास गेलेल्या बारमालकाच्याच डोक्यात काचेच्या ग्लासने मारत जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री हॉटेल परिंदा येथे घडली.
संपत शंभु शेट्टी (वय ३३ रा. यशोलक्ष्मी मंगल कार्यालयजवळ) असे जखमीचे नांव आहे. या प्रकरणी प्रथमेश संजय ठोंबरे (वय २१ रा. शिखरे हॉस्पिटल मागे) व संगमेश्वर सिध्दाण्णा बिराजदार (वय २२ रा. जवाहरनगर मुळीक गल्ली) यांच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरातील नाईट कॉलेजनजीक परिंदा बार व परमिट रुम आहे. या बारमध्ये प्रथमेश ठोंबरे व संगमेश्वर बिराजदार हे दोघे दारु पिण्यासाठी गेले होते. हे दोघेजण एकमेकांना शिवीगाळ करत जोरजोरात भांडण करत होते. ते पाहून बारमालक संपत शेट्टी व त्यांचा मॅनेजर हे भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी प्रथमेश याने शेट्टी यांच्या डोक्यात काचेच्या ग्लासने मारत जखमी केले. तर मॅनेजरलाही शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी संपत शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला – आहे.