दिव्यांग मुलीला खाऊचे आमिष दाखवत तिला निर्जनस्थळी नेत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी वृध्दावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मच्छिंद्र तात्याबा कारंडे (वय ६९ रा. आवळे गल्ली) असे त्याचे नांव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, २१ वर्षीय दिव्यांग मुलीस खाऊचे आमिष दाखवत मच्छिंद्र कारंडे याने एका गोदामाच्या पाठीमागील बाजूस निर्जनस्थळी नेत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.