Saturday, January 17, 2026
Homeइचलकरंजीजांभळी, नांदणी, दानोळी,दतवाड, अब्दुललाट जयसिंगपूरसह शिरोळ तालुक्यात करणी भानामतीचे प्रकार

जांभळी, नांदणी, दानोळी,दतवाड, अब्दुललाट जयसिंगपूरसह शिरोळ तालुक्यात करणी भानामतीचे प्रकार

ताजी बातमी ऑनलाइन टीम

शिरोळ तालुक्यातील जांभळी, नांदणी, दानोळी,दतवाड, अब्दुल लाट जयसिंगपूरसह यासह इतरही अनेक गावात अलीकडच्या काळात करणी व भानामतीचे प्रकार वाढले आहेत.

जांभळी येथे एका महिन्यात जवळपास पाच वेळा अशा जादूटनेचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये बाभळीच्या झाडाला दोन महिलांचे फोटो व तरुणाचे फोटो खेळू मारून अडकून ठेवले होते.

तसेच काळाभवल्या बीपी लिंबू आणि जादूटोणा करण्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी आढळून आले होते यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. तर बाराचे तेरा नारांना एकत्र बांधून प्रत्येक नारळावर नावांची चिठ्ठी दोऱ्याने बांधून हे साहित्य पूर्ण झाले होते.

असाच प्रकार शिरूर अर्जुनवाड रोडवरील सोशलभूमीत देखील उघडकीस आला होता यामुळे शिरोळ तालुक्यात भोंदूगिरी चे वर्चस्व निर्माण झाले असून त्यामुळे अनेक महिला तसेच नागरिक या करणे व भानामवतीच्या प्रकारात अडकल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची गरज आता या भागात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -