कोकणातून येणारा फळांचा राजा आंब्याची कोल्हापूर बाजारात आवक वाढू लागली आहे. कोल्हापूर बाजार समितीत गुढी पाडवा आणि रमजान ईदमुळे हापूस आंबा येऊ लागला आहे.
आंबा बाजारात आला असला तरी दरात मात्र मोठी तेजी पहायला मिळत आहे. १ हजारांपासून १ हजार ८०० रूपयांपर्यंत डझनाचे दर आहेत. याचबरोबर रसाळ कलिंगड, मोसंबी आदी फळांना मागणी वाढली आहे. धान्य बाजारातही उलाढाल पहायला मिळत आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाल्याची आवक उन्हाळ्यात वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कांद्याची आवक मोठी झाल्याने दर अचानक पडल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यापाठोपाठ टोमॅटो, वांग्याचे दर कमी झाले आहेत. काकडीचा हंगाम जोमात असून आवक वाढेल तसे उन्हाळी, देशी, काटा काकडीचे दर कमी होताना दिसत आहेत.
ओला वाटाणा शेंगाची आवक अंतिम टप्प्यात असल्याने मागणीसह दर वाढत आहेत. देशी कैरीची आवक सुरू झाली आहे. उन्हाळी ओल्या भुईमुगाच्या शेंगा बाजारात विक्रीस आल्या आहेत. लिंबू १० रूपयांना २ झाले असूनही मागणीला जोर आहे. फळबाजारात हंगामी फळांनाच मागणी टिकून आहे. तसेच उन्हाळ्यात अनेकजण वर्षभर धान्यसाठा खरेदीसाठी येत असल्याने विक्री वाढली आहे. तर लाल मिरचीचीही मागणी वाढली आहे.
नारळाच्या दरात मोठी वाढ
नारळ बाजारात ग्राहकांना दरवाढीची झळ सोसावी लागत आहे. साध्या नारळासह कुमठा नारळाचे दर कमालीने वाढले आहेत. कुमठा नारळ विक्रीत प्रतिनग १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याच्या नारळाचे भाव वाढतच आहेत.
टोमॅटो- १० ते १५ , दोडका- ५० ते ६०, वांगी – ३० ते ४०, कारली- ३० ते ४०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची – ६० ते ७०,फ्लॉवर – १० ते १५ , कोबी- १५ ते २० , बटाटा- २५ ते ३० , कांदा – २० ते २५, लसूण- १०० ते १२०, आले – ४० ते ५०, लिंबू – ३५० ते ७०० शेकडा, गाजर -४० ते ५० , बीन्स- ४० ते , गवार – ८० ते १०० , भेंडी- ५० ते ६० , ओला वाटाणा – ६० ते ८०, देशी काकडी- ४० ते ५०, काटा काकडी – २० ते ३०, दुधी – २० ते ३०, भाज्या – १० ते १५ रुपये पेंढी, शेवगा -२ ते ३ रुपये नग.
फुले
झेंडू – ८० ते १०० , निशिगंध – ३०० ते ३५०, गुलाब – २५० ते २८०, गलांडा -१०० ते १३०, शेवंती – १५० ते २००.
फळे
सफरचंद – २०० ते २५०, संत्री – ७० ते ८०, मोसंबी- ८० ते १००, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरु – ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ६० ते १००, मोरआवळा -१२० ते २००, सीताफळ – ८० ते १००, कलिंगड – ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी – ५० ते ६० डझन, देशी केळी – ८० ते १०० डझन, किवी – १०० ते १२०, ड्रॅगन- १५० ते २००, स्ट्रॉबेरी – ६० ते ८० नग, चिंच- १०० ते १४०, अननस – १०० ते १२०.
कडधान्य
हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५०, गहू – ३७ ते ४४, हरभराडाळ – ७५ ते ७८ , तुरडाळ- ११० ते १२० , मुगडाळ -१०० ते ११०, मसूरडाळ – ७७ ते ७८, उडीदडाळ – १२० ते १२५, हरभरा- ७० ते ७८ , मूग- ९२ ते १००, मटकी- ९५ ते १००, मसूर- ७० ते ७२, फुटाणाडाळ – १०५ ते ११०, चवळी- ९० ते १२५ , हिरवा वाटाणा- १७५, छोले -१२० ते १५०.