Sunday, August 24, 2025
Homeब्रेकिंगआजपासून उष्णतेची लाट तीव्र; हवामान विभागाचा इशारा

आजपासून उष्णतेची लाट तीव्र; हवामान विभागाचा इशारा

राज्यातील पावसाचा अलर्ट संपल्याने वातावरण पुन्हा कोरडे झाले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रामुख्याने मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात ही लाट अधिक तीव्र राहणार आहे.

 

रिअल टाइम टेम्परेचरनुसार रविवारी दुपारी 4 वाजता सोलापूर 41.8, नाशिक 41.5, तर पुणे (कोरेगाव पार्क) 40 अंशांवर गेले होते.राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, ती पूर्णपणे मावळली आहे.

 

कारण बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील स्थिती बदलली आहे. त्या भागातून येणारे बाष्पयुक्त वारे थांबले, त्यामुळे पुन्हा कोकण, विदर्भाला दिलेला पावसाचा अलर्ट पूर्णपणे थांबला, त्यामुळे पुन्हा राज्यात उष्णतेची लाट सोमवारपासून (दि. 24 मार्च) जोर धरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भर दुपारी राज्यातील बहुतांश भागांचे तापमान 38 ते 41 अंशांवर जात आहे.

 

या शहरात दुपारी सर्वाधिक तापमान…

 

रिअल टाइल टेम्परेचर म्हणजे प्रत्यक्ष वेळेचे तापमान हवामान विभागाच्या संकेतस्थळावर तपासले असता, रविवारी (दि. 23 मार्च ) दुपारी 4 वाजता राज्यात सर्वाधिक तापमान सोलापूर (41.8), नाशिक (40.7), जळगाव 39.4, छ. संभाजीनगर 38.3 अंश सेल्सिअस इतके होते.

 

ही झाली आहेत उष्णतेची बेटे..

 

नंदुरबार, जळगाव, पुणे, ठाणे, संभाजीनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, परभणी.

 

अशी राहील उष्णतेची लाट (आगामी पाच दिवस)

 

मध्य महाराष्ट्र: 37 ते 41 अंश

 

उत्तर महाराष्ट्र: 38 ते 41

 

मराठवाडा: 37 ते 39 अंश

 

विदर्भ: 36 ते 38 अंश

 

कोकण: 32 ते 37 अंश

 

रविवारचे दुपारी 4 वाजताचे तापमान

 

सोलापूर (41.8), नाशिक (41.5), पुणे (कोरेगाव पार्क) 40, जळगाव 39.4, छ. संभाजीनगर 38.3, सोलापूर 39.1, मालेगाव 38.7, मुंबई (कुलाबा) 32.4, सांताक्रूझ 33.5, रत्नागिरी 33, कोल्हापूर 37.1, महाबळेश्वर 32.8, सांगली 37.4, सातारा 36.7, नागपूर 37.2, नांदेड 37.4

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -