तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑइल इंडिय लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. जर तुम्हाला चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती ही oil-india.com या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
ऑइल इंडियामध्ये ड्रिलिंग इंजिनियर (Engineer) पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही संबंधित क्षेत्रात शिक्षण घेतले असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. ऑइल इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
ऑइल इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २४ ते ४० असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ४ वर्षांची इंजिनियरिंग ग्रॅज्युएशन पदवी पदवी प्राप्त केलेली असावी किंवा २ वर्षांची मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी. ऑइल इंडियामधील या भरतीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ८०००० रुपये मासिक पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. २ एप्रिल २०२५ ला हे इंटरव्ह्यू होणार आहे. सकाळी ९.३० ते ११.०० वाजेपर्यंत उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
जर तुम्ही इंजिनियरिंग केले असेल अन् नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. इंजिनियरिंग केल्यानंतर सरकारी कंपनीत काम करण्याची संधी आहे. ही नोकरी केल्याने तुम्हाला चांगला अनुभवदेखील मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकाने लवकरात लवकर अर्ज करावेत.