Thursday, June 26, 2025
Homeइचलकरंजीहुपरी बंदला कडकडीत प्रतिसाद

हुपरी बंदला कडकडीत प्रतिसाद

हुपरी येथील चांदी बनावट पाटला प्रकरणी कडकडीत बंद पाळण्यात आला. यातून चांदी उद्योजकांचा उद्रेक दिसून आला. या बंदमधून अत्यावश्यक एसटी बस सेवा वगळण्यात आली होती. डीवायएसपी समीरसिंह साळवे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उद्योजकांच्या अडचणी लक्षात घेतल्या व चांदी भेसळ प्रकरणातील गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही, अशी हमी दिल्याने सदर उपोषण व बेमुदत गाव बंद आंदोलन स्थगित करण्यात आले.

या फसवणूकीतुल मुख्य सुत्रधार अभिजित माने यांसह सर्व आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता तपासून हळूहळू आश्चर्यकारक घडामोडी घडणार आहेत. यातून

आरोपींची यादी वाढतच जाणार आहे. आजच्या बंदला शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, अजित पवार गट, ताराराणी विकास आघाडी, भारतीय जनता पार्टी, आरपीआय यांसह

विविध पक्षांच्या पदाधिकायांनी पाठिंबा व्यक्त केला. भेसळ चांदी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी व यातून मोकाट सुटलेल्या आरोपींची कसून चौकशी अंती गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी संपूर्ण चांदी उद्योजक एकवटल्याचे आज दिसून आले. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद ठेवून या गंभीर घटनेचा जोरदार निषेध केला. बस सेवा सुरू ठेवल्याने प्रवाशांची कुचुंबना झाली नाही तर दिवसभरात कुठलाही अनुचित प्रकार घडून आला नाही.

दरम्यान या प्रकरणाची धग लक्षात घेऊन डीवायएसपी समीरसिंह

साळवी यांनी लोकांशी संवाद साधून अडचणी व फसवण्याचा प्रकार जाणून घेत जिल्हा पोलिस प्रमुखांशी दुरध्वनी वरून याबाबत सविस्तर माहिती दिली. तर यावेळी उपस्थितांनी सेलम व्यापान्याच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांची संशयास्पद भुमिका दिसून येत असल्याचा आरोप केला. यावेळी संबंधित मोहिते नामक सेलमच्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधला असून त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी

परत बोलावून घेतले असल्याचा खुलासा केला. वरिष्ठांच्या आदेशानुसार या चांदी भेसळ प्रकरणाचा योग्य तपास केला जाईल. यामध्ये दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घालणार नाही याची खात्री दिली व फसवणूक झालेल्यांनी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत निवेदन सादर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -