Tuesday, April 29, 2025
Homeतंत्रज्ञानआनंदाची बातमी !1 एप्रिलपासून वीजदर कमी होणार; युनिटमागे किती होणार फायदा? कसे...

आनंदाची बातमी !1 एप्रिलपासून वीजदर कमी होणार; युनिटमागे किती होणार फायदा? कसे राहणार दर? वाचा

राज्यातील घरगुती, औद्योगित व वाणिज्यिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून विजदर कमी होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी व बेस्टसह अन्य वीज वितरण कंपन्यांना नवीन वीज दर लागू करण्यास शुक्रवारी मध्यरात्री मंजूरी दिली.

 

व्यवसायिक स्मार्ट मीटर ग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ आणि रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत १० ते ३० टक्के वीज दर कमी होणार आहे. वीज कंपन्यांच्या या नवीन दरामुळे वीज ग्राहक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 

किती टक्के वीज दर कमी?

 

एक एप्रिलपासून महावितरण कंपनीचे वीजदर १० टक्क्यांनी कमी होणार आहेत. अदानी कंपनीचे वीजदरही १० टक्के कमी होणार आहेत. तर टाटा कंपनीचे १८ टक्के वीजदर कमी होणार आहेत. तसेच बेस्ट वीज कंपनीचे वीजदर ९.२८ टक्के कमी होणार आहेत. कृषी ग्राहकांसाठी आणि व्यावसायिक ग्राहकांच्या सबसिडीचा भार एक एप्रिलपासून पुढे हळूहळू कमी होणार आहे.

 

वीजदर कमी करण्याचे कारण काय?

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. आता १ एप्रिलपासून ग्राहकांना वीज कमी दरात मिळणार आहे. वीजदर कमी होण्याची दोन-तीन कारणं आहेत. एक म्हणजे अपारंपरिक ऊर्जा आणि सौर ऊर्जा ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे वीजदर कमी झाले आहेत. सध्या सौरऊर्जेचे दर प्रति युनिट तीन साडेतीन रुपये आहेत. तर अपारंपरिक ऊर्जाचा दर प्रति युनिट ८ ते ९ रुपये आहे. दुसरीकडे महावितरणचे दर हे सध्या प्रति युनिट ४ ते ४.५० रुपये आहे. पण हेच दर १ एप्रिलपासून आणखी कमी होणार आहेत.

 

महावितरणचे घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट दर

 

० ते १००- सध्याचे ४.७१ नवीन दर ४.४३

 

१०१ ते ३००- सध्याचे १०.२९ नवीन दर ९.६४

 

३०१ ते ५००- सध्याचे १४.५५ नवीन दर १२.८३

 

५०० पेक्षा जास्त- सध्याचे १६.७४ नवीन दर १४.३३

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -