Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रइकडे भूकंपामुळे पृथ्वी हादरत होती तर तिकडे… रस्त्यावर झाला मुलाचा जन्म

इकडे भूकंपामुळे पृथ्वी हादरत होती तर तिकडे… रस्त्यावर झाला मुलाचा जन्म

बँकॉकमध्ये शुक्रवारी एक अनपेक्षित घटना घडली. म्यानमारमध्ये 7.7 आणि 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के थायलंड पर्यंत पोहोचले होते. त्यामुळे डॉक्टरांना तातडीने पोलीस जनरल हॉस्पिटल रिकामे करावे लागले. या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांनी महिला रुग्णाला रुग्णालयातून बाहेर काढले आणि रस्त्यातच तिची प्रसूती झाली. एवढ्या कठीण परिस्थितीतही बाळाचा सुखरूप जन्म झाला हा निसर्गाचा चमत्कारच म्हणता येईल.

 

रुग्णालयाचे प्रवक्ते कर्नल सिरिकुल श्रीसांगा यांनी सांगितले की, भूकंप झाला तेव्हा या महिलावर शस्त्रक्रिये सुरु होती. त्यामुळे डॉक्टरांनी तिला सुरक्षित ठिकाणी नेले आणि बाळाचा जन्म झाला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक महिला स्ट्रेचरवर झोपलेली दिसत आहे. उघड्यावर प्रसूतीसाठी रुग्णालयातील कर्मचारी मदत करत आहेत. या वेळी इतर रुग्णांनाही रुग्णालयाच्या आवारात हलवण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

 

भूकंप झाला तेव्हा महिलेवर शस्त्रक्रिया सुरु होती

 

थाई एन्क्वायररच्या म्हणण्यानुसार, भूकंप झाला तेव्हा महिला शस्त्रक्रियेच्या मध्यभागी होती. पोलीस लेफ्टनंट कर्नल जिरामृत म्हणाले, “भूकंपाच्या वेळी पोटाची शस्त्रक्रिया सुरु होती. सर्जिकल टीमने रुग्णाला स्थिर करून सुरक्षित ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला.”

 

रूग्ण आणि रूग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सर्जनने दिली आहे. भूकंप होत असल्याचे कळताच शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी फायर इमर्जन्सी एग्झिटचा वापर केला. त्यामध्ये त्यांनी रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. रुग्णांना तीन नियुक्त क्षेत्रांमध्ये स्थानांतरित केले गेले.

 

थायलंडच्या अनेक भागात जाणवले भूकंपाचे धक्के

 

शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार 12:50 च्या सुमारास म्यानमारमध्ये 7.7 आणि 6.4 तीव्रतेचे भूकंप झाले. थायलंडमधील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे इमारती हादरल्या आणि जलतरण तलाव ओसंडून वाहू लागले. म्यानमारमधील शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या शनिवारी 1,000 च्या पुढे गेली. कारण देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहराजवळील इमारती कोसळल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -