नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात एप्रिल महिन्यापासून होत (remain)असून, या महिन्यात बँकिंग व्यवहार करणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या तारखांवर बँका बंद राहणार आहेत. गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया, परशुराम जयंती यांसारख्या सणांमुळे अनेक राज्यांमध्ये बँक सेवा बंद राहणार आहेत.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दरमहा बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. काही सुट्ट्या राष्ट्रीय असतात, तर काही प्रादेशिक स्वरूपाच्या असतात. त्यामुळे तुमच्या शहरातील बँका कोणत्या दिवशी बंद राहतील हे जाणून घेणं आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात.
एप्रिल 2025 मधील बँक सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक :
1 एप्रिल: आर्थिक वर्षाचा पहिला दिवस – बँकांचे लेखा बंदीचे कामकाज; संपूर्ण भारतात बँका बंद.
15 एप्रिल: बंगाली नववर्ष आणि बिहू – आसाम, पश्चिम बंगाल, (remain)अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद.
18 एप्रिल: गुड फ्रायडे – त्रिपुरा, आसाम, राजस्थान, जम्मू, श्रीनगरसह अनेक राज्यांमध्ये बँका बंद.
21 एप्रिल: गारिया पूजा – त्रिपुरामधील बँका बंद.
29 एप्रिल: परशुराम जयंती – हिमाचल प्रदेशातील बँका बंद.
30 एप्रिल: बसवा जयंती आणि अक्षय तृतीया – कर्नाटकातील बँका बंद.
या सुट्ट्यांमध्ये बँक शाखा बंद असतील, मात्र डिजिटल बँकिंग, (remain)UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल अॅप्स, आणि ATM सेवा २४x७ उपलब्ध राहतील. त्यामुळे व्यवहार अडथळ्याशिवाय पार पडण्यासाठी डिजिटल पर्यायांचा वापर करा.जर तुम्हाला रोख रक्कम काढायची असेल, चेक क्लिअर करायचा असेल किंवा शाखा-आधारित सेवा वापरायची असेल, तर वरील सुट्ट्यांचे वेळापत्रक लक्षात घेऊन तुमचं नियोजन आधीच करा.