Wednesday, July 23, 2025
Homeमहाराष्ट्रGhibli Style मध्ये फोटो तयार कणाऱ्यांसाठी वाईट बातमी, Open AI ने घेतला...

Ghibli Style मध्ये फोटो तयार कणाऱ्यांसाठी वाईट बातमी, Open AI ने घेतला मोठा निर्णय

ओपन आय कंपनीद्वारे विकसीत लोकप्रिय एआय चॅटबॉट चॅटजीपीटी वापरणाऱ्यांना रविवारी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चॅटजीपीटींचं एक्सेस डाऊन झाल्यामुळे युजर्समध्ये निराशा पाहण्यात आली.

 

घिबली आर्टमुळे चॅटजीपीटींचं एक्सेस डाऊन झाल्याचं सांगण्यात आहे. चॅटजीपीटीमध्ये घिबली फोटो निर्माण करण्याचं प्रमाण वाढल्यामुळे चॅटजीपीटींचं एक्सेस डाऊन झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. पण याबद्दल डेव्हलपरने मोठी अपडेट दिली आहे. सर्व प्रभावित सेवा पूर्णपणे पुनर्संचयित केल्या गेल्या आहेत. पुढील अपडेट पाच दिवसांत कळेल असं देखील सांगितलं आहे.

 

शनिवारपासून यूजर त्रासले आहेत…

 

शनिवारी संध्याकाळपासून चॅटजीपीटीच्या युजर्सना अनेत संकटांचा सामना करावा लागत आहे. संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान अडचणींमध्ये मोठी वाढ झाली. कारण स्टुडिओ घिबली-शैलीतील ॲनिमेटेड फोटो तयार करण्यासाठी वापरकर्ते चॅटबॉट वापरत होते. यानंतर इंटरनेट मीडियावर यूजर्सच्या तक्रारी येऊ लागल्या.

 

सांगायचं झालं तर, एका रात्रीत घिबली आर्ट सर्वत्र ट्रेंड झाला आणि अनेकांनी फोटो तयार करण्यासाठी चॅटबॉटचा वापर करण्यास सुरुवात केली. दरम्यान आउटेज ट्रॅक करणाऱ्या कंपनीने सांगितलं की, 229 युजर्सने तक्रार दाखल केली आहे. ज्या तक्रारी दाखल झाल्या आहेत, त्यामध्ये जवळपास 59 तक्रारी या चॅटजीपीटी संबंधीत आहेत.

 

यावर ओपनआय कंपनीचे सीईओ सॅम आल्टमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वापर वाढल्यामुळे जीपीयूवर दबाव पडल्याने अडचणी येत आहेत. काही कालावधीसाठी फोटो तयार करण्याची संख्या मर्यादीत ठेवण्यात येणार आहे. ChatGPT च्या मोफत वापरकर्त्यांना लवकरच दररोज तीन फोटो तयार करण्याची परवानगी दिली जाईल.

 

काय आहे घिबली स्टाईल फोटो?

 

नुकताच ओपन एआयने चॅटजीपीटी प्लस, प्रो आणि टीम वापरकर्त्यांसाठी इमेज जनरेशन फीचर लाँच केलं. ज्यामुळे इंटरनेटवर नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमचे खरे फोटो जपानच्या प्रसिद्ध स्टूडिओ घिबलीच्या एमीनेटेड स्टाईलमध्ये करु शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -