आयपीएलच्या 18 व्या मोसमात आतपर्यंत मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मुंबईला 4 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. तर मुंबईने 3 सामने गमावले आहेत. मात्र आता मुंबईची ताकद दुप्पट झाली आहे. मुंबईचा हुकमाचा एक्का अखेर परतला आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याची अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मुंबई टीममध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाली होती. त्यामुळे बुमराहला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला मुकावं लागलं. तसेच आयपीएलमधील 4 सामन्यांतही खेळता आलं नाही. मात्र आता बुमराह परतल्याने प्रतिस्पर्धी संघातही दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
बुमराह केव्हा खेळणार पहिला सामना?
आता बुमराह परतल्याने तो या 18 व्या मोसमातील त्याचा पहिला सामना केव्हा खेळणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. मुंबई या मोसमातील पाचवा सामना सोमवारी 7 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध खेळणार आहे. बुमराह या सामन्यातून कमबॅक करणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र बुमराह केव्हा मैदानात परतणार? याबाबत अजूनही निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही.
बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेन्समध्ये होता. बुमराहने या सेंटर ऑफ एक्सीलेन्समध्ये दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक ते सर्व केलं आणि तो फीट झाला. मात्र तो केव्हा खेळणार? याबाबत टीम मॅनेजमेंटकडून अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र बुमराह 13 एप्रिलला दिल्ली कॅपिट्ल्सविरुद्ध होणाफऱ्या सामन्यातून कमबॅक करेल, अशी आशा आहे.
सिडनी कसोटीत दुखापत
बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटी सामन्यादरम्यान 4 जानेवारीला दुखापत झाली होती. या दुखापतीमळे बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकावं लागलं होतं. तसेच आयपीएलच्या 4 सामन्यांतून बाहेर रहावं लागलं. आता बुमराह आयपीएलमध्ये सर्व भरपाई भरुन काढेल आणि मुंबईला विजयी करण्यात योगदान देईल, असा विश्वास पलटणच्या चाहत्यांना आहे.
दरम्यान बुमराह मुंबईसह 2013 पासून आहेत. बुमराहने आतापर्यंत 133 सामन्यांमध्ये 165 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबईने बुमराहला 18 कोटी रुपयांमध्ये कायम (रिटेन) ठेवलं आहे.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.