Saturday, April 18, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर : पुलाची शिरोली येथे दारूच्या नशेत तरूणाचा मृत्यू

कोल्हापूर : पुलाची शिरोली येथे दारूच्या नशेत तरूणाचा मृत्यू

शिरोली एमआयडीसी : पुलाची शिरोली ता हातकणंगले येथे लोटस फर्निचर शेजारी दारूच्या नशेत पडलेल्या ३७ तरूणाचा मृत्यू झाला. मयत तरूणाचे नाव प्रविण प्रताप स्वामी (रा. राजारामपुरी कोल्हापूर) असे असून तो व्यसनाधीन होता त्याचे व्यसन सोडवण्यासाठी त्याला काही दिवसापूर्वीच व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले होते तेथून तो घरी आल्यावर त्याने परत दारू पिण्यास सुरू केली होती. तो दारू पिऊन पुलाची शिरोली येथे शनिवारी पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे. हा मृतदेह नेण्यासाठी १०८ अॅम्बुलन्स मागवली पण ही आलेली अँम्बुलंन्स चालकाच्या चुकीने शेतात शिरली पण ती अँम्बुलन्स बाहेर काढणे मुश्किल झाले जवळ जवळ तास दीड तास अडकून पडल्याने दुसरी अँम्बुलंन्स मागवावी लागली. मग प्रविण याचा मृतदेह नेला उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील सिपीआर हॉस्पीटल येथे नेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -