Friday, June 27, 2025
Homeकोल्हापूरविजय होताच हवेत गोळीबार, कोल्हापुरातील माजी सरपंचाचा प्रताप; कारवाई कधी?

विजय होताच हवेत गोळीबार, कोल्हापुरातील माजी सरपंचाचा प्रताप; कारवाई कधी?

कोल्हापुरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. दूध संस्थेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर माजी सरपंचाने हवेमध्ये गोळीबार केला. विजयोत्सवामध्ये माजी सरपंचाने हवेमध्ये दोन राऊंड फायरिंग केले.

 

याचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या माजी सरपंचावर पोलिसांकडून कारवाई करण्यास कुचराई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

 

कोल्हापूरपासून जवळच असणाऱ्या हाणमंतवाडी गावांमधील दूध संस्थेच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर माजी सरपंच संग्राम भापकरने हवेमध्ये गोळीबार केला. गावातील इर्षा दूध संस्था निवडणुकीत त्यांचा विजय झाला. संग्राम भापकर यांनी विजय झाल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केला. याचा रिल आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या हणमंतवाडीमध्ये जय बजरंग दूध संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्तांतर झालं. सत्ताधारी सरदार पिंजरे यांना धक्का देत माजी सरपंच आणि यशवंत बँकेचे माजी संचालक संग्राम भापकर यांनी सत्ता मिळवली. संग्राम भापकर यांचा विजय होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावत जल्लोष केला.

 

यावेळी विजय साजरा करताना माजी सरपंच संग्राम भापकर यांनी हवेत गोळीबार केला. भापकर यांचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलंय की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी संग्राम भापाकर यांनी हवेत गोळीबार केला होता. अजूनपर्यंत त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -