भारतीय फिनटेक क्षेत्रातील अग्रेसर कंपनी पेटीएम (Paytm) ने मार्च 2025ने तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा घाटा कमी होऊन 545 कोटी रुपये राहिला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत तो 551 कोटी होता. ऑपरेशनलमधील कमाईत घट झाली आहे. पण खर्चातील कपात आणि फायनान्शियल सर्व्हिसने उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. मार्च 2025 तिमाहीत कंपनीची एकूण ऑपरेटिंग रक्कम 1,911.5 कोटी राहिली. ती गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या 2,267.1 कोटीच्या तुलनेत सुमारे 15.7 टक्क्यांनी कमी आहे. पण या तिमाहीत कंपनीने ESOPपूर्वी EBITDA (व्याज, कर, घसारा आणि इतर वजावटीपूर्वीचा नफा) 81 कोटींचा नफा दाखवला आहे.
Q4 FY25 मध्ये मिळालेल्या UPI प्रोत्साहनासह EBITDA रुपये 81 कोटी इतका होता. मात्र, हे प्रोत्साहन वगळता EBITDA तिमाहीतून तिमाहीत 51 कोटींची सुधारणा होत 11 कोटी झाला आहे. कंपनीने या तिमाहीत 522 कोटींचा अपवादात्मक खर्च केला, त्यात 492 कोटींचा एकवेळचा, नॉन-कॅश ESOP खर्च आणि 30 कोटींची उपकंपन्यांमधील गुंतवणुकीवरील घसारा समाविष्ट होता.या अपवादात्मक खर्चांचा विचार केल्यानंतर कंपनीचा करानंतर नफा (PAT) (23) कोटींवर पोहोचला आहे. UPI प्रोत्साहन आणि एकवेळचा खर्च वगळल्यास PAT मध्ये 115 कोटींची तिमाही सुधारणा होत (93) कोटी झाला आहे.
ऑपरेशनल महसूल वाढला
पेटीएमचा Q4 FY25 मध्ये ऑपरेशनल महसूल 5 टक्के वाढून 1,911 कोटींवर गेला. योगदान नफा (Contribution Profit) 12 टक्के वाढून 1,071 कोटी झाला असून, योगदान मार्जिन 56 टक्क्यांपर्यंत सुधारला आहे. आर्थिक सेवा क्षेत्रातील महसूल 9 टक्क्यांनी वाढून 545 कोटी झाला, तर व्यापारिक कर्ज वितरण 4,315 कोटींवर पोहोचले आहे. यातील 50 टक्क्याहून अधिक कर्जे पुनः कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना दिली गेली, ज्यामुळे मजबूत क्रेडिट परफॉर्मन्स आणि ग्राहक धारणा दर्शवली जाते.
पेमेंट्स विभागात स्थिर परतावा
पेमेंट्स विभागानेही स्थिर परतावा दिला आहे. या विभागातील नेट पेमेंट मार्जिन 578 कोटी झालाय. यात 70 कोटी यूपीआय प्रोत्साहन समाविष्ट आहे. प्रोत्साहन वगळल्यास हा मार्जिन 508 कोटी असून, तिमाहीत 4 टक्के वाढलेला आहे. पेटीएमकडे तिमाही अखेरीस 12,809 कोटींचा अत्यंत चांगला रोख साठा होता, जो भावी वाढीसाठी बळकटी देतो.
कंपनीने ग्राहक आणि व्यापारी वापर वाढवण्यात सातत्य दाखवले. Q4 मध्ये GMV (Gross Merchandise Value) 5.1 लाख कोटींवर पोहोचले, तर दरमहा अॅक्टिव्ह युजर्स (MTUs) 7.2 कोटींपर्यंत वाढले. पेमेंट डिव्हाइसेस वापरणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या तिमाहीत 8 लाखांनी वाढून एकूण 1.24 कोटींवर पोहोचली आहे. पेटीएमने तांत्रिक नेतृत्वही बळकट केले आहे. कंपनीने भारतातील पहिला सोलर साउंडबॉक्स आणि महाकुंभ साउंडबॉक्स सादर करून आपल्या नवोन्मेष नेतृत्वाला अधिक बळ दिलं आहे. हे नवीन उत्पादने केवळ साउंडबॉक्स श्रेणीत पेटीएमचं वर्चस्व अधोरेखित करतात असे नाही, तर व्यापाऱ्यांमध्ये वित्तीय सेवांचे वितरण वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतात.