Saturday, February 14, 2026
Homeइचलकरंजीबनावट धनादेशाद्वारे फसवणूक : एकास शिक्षा

बनावट धनादेशाद्वारे फसवणूक : एकास शिक्षा

बनावट धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने दोन वेगवेगळ्या तक्रारीमधून दिलीप ज्ञानू साळुंखे (रा. इस्लामपूर) यास दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकबर अब्दुलरसिद मुतवल्ली (रा. इचलकरंजी) यांनी पेट्रोलपंप भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला होता. सदर पेट्रोल पंपावर दिलीप साळुंखे हा मॅनेजर म्हणून कामास होता. सदर आर्थिक व्यवहाराची कामे तोच पहात होता… मुतवल्ली यांचे पेट्रोल पंपाच्या हिशोब अंती साळुंखे यांने ९ लाख ५५ हजार रुपये इतकी रक्कम स्वतःसाठी वापरल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार दिलीप साळुंखे यांने अकबर मुतवल्ली यांना दोन धनादेश दिले होते. मात्र, सदरचे धनादेश न वटता परत आल्याने साळुंखे याच्यावर दोन वेगवेगळ्या तक्रारी न्यायालयात दाखल केल्या. पहिल्या तक्रारीमध्ये १० लाख रुपये दंड व ३ महिन्याची शिक्षा सुनावली तर दुसऱ्या केसमध्ये ९ लाख ९० हजार रुपये दंड व तीन महिन्याची साधी कैदची शिक्षा सुनावली. दोन्ही तक्रारीची दंडाची रक्कम एका महिन्यात फिर्यादीला न दिल्यास पुन्हा एक महिन्याची शिक्षा असा आदेश न्यायालयाने दिला. फिर्यादी अकबर मुतवल्ली यांच्यावतीने अॅड. राहुल काटकर यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -