Homeइचलकरंजीइचलकरंजी मेल आयडी हॅक करुन १९ लाखाची फसवणूक

इचलकरंजी मेल आयडी हॅक करुन १९ लाखाची फसवणूक

ई मेल आयडी हॅक करुन त्याद्वारे प्रोडक्ट पुरविण्याचे आमिष दाखवत २२ हजार २२५ अमेरिकन डॉलर्स म्हणजेच १९ लाख ३३ हजार २६६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी रजत राजेंद्रकुमार राठी (वय ३९ रा. रामकृष्णनगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील रजत राठी यांच्या

 

मालकीची मिरॅकल इंडस्ट्रीज या नांवे फर्म आहे. अज्ञाताने या फर्मचा इ मेल आयडी हॅक करन फर्म व व्यवसाय संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर २९ जून ते १५ जुलै २०२६ या कालावधीत राठी हे ज्या कंपनीशी सातत्याने व्यवहार करतात त्याच कंपनीतून मेल पाठवतो असे भासवले. दुसऱ्या एका इ मेल द्वारे राठी यांच्या संपर्कात राहुन त्यांनी कंपनीच्या अकर्कोटला प्रॉब्लेम झाला असून डीकी इंटरप्रायझेस एलएलसी या कंपनीचा प्रोफार्मा व त्यामध्ये बँक ऑफ अमेरिका याबाबतचे डिटेल्स देऊन राठी यांना हवे तेवढे प्रोडक्ट पुरविण्याचे सांगत त्यांच्याकडून त्या अर्कीटवर २० हजार २२५ अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनाचे १९ लाख ३३ हजार २६६ रुपये घेतले. मात्र प्रोडक्ट न पुरविल्याने आपली फसवणूक झाल्याप्रकरणी राठी यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -