भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1255 वर तर आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर केरळ, महाराष्ट्र, दिल्लीसह, उत्तर प्रदेशातही कोरोनाच्या नवीन प्रकारांचे रुग्ण सातत्याने येत आहेत. अशा परिस्थितीत आता कोरोनाची चौथी लाट येते की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचदरम्यान आता कोविडच्या वाढत्या धोक्यात BHU च्या एका शास्त्रज्ञानेही एक मोठा दावा केला आहे.
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे म्हणाले की, कोरोनाचा हा नवीन उप प्रकार JN.1 आहे जो आता आशियाई देश सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिका नंतर भारतात पसरत आहे.
२१ ते २८ दिवसांनी रुग्णसंख्या कमी होईल?
कोविडच्या वेगवेगळ्या लाटांचा संसर्ग कालावधी वेगवेगळा राहिला आहे. पहिल्या लाटेत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, त्यामुळे संसर्गाचा वेग खूपच कमी होता. या कारणास्तव, पहिल्या लाटेत संसर्ग कालावधी सुमारे ६० दिवसांचा होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेत, हा कालावधी २१ दिवसांत उच्च पातळीवर पोहोचला. त्याच वेळी, तिसरी लाट येथे २८ ते ३२ दिवस सक्रिय राहिली. यावरून हे स्पष्ट होते की, ओमिक्रॉनचा हा उप प्रकार लोकांना आणखी वेगाने प्रभावित करू शकतो. ज्याच्या आधारे असे म्हणता येईल की तो २१ ते २८ दिवसांत उच्च पातळीवर पोहोचू शकतो. त्यानंतर, कोविडचे रुग्ण पुन्हा कमी होऊ लागतील.
तसेच कोरोना JN.1 आणि NB.1.8 चे हे दोन नवीन प्रकार किती प्राणघातक असू शकतात. यासाठी त्यांची टीम सतत संशोधन करत आहे. नवीन प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग खूप महत्वाचे आहे. अशा प्रकारे विषाणूचे उत्परिवर्तन शोधले जाते. दुसऱ्या लाटेदरम्यान, अल्फासोबत कोरोनाचे आणखी दोन प्रकार आढळले. त्यामुळे समुदायाचा प्रसार झाला आणि त्यानंतर सर्वाधिक मृत्यू झाले. यावेळी अशी शक्यता आहे की नाही यावर संशोधन सुरू आहे. लवकरच बीएचयूमधील शास्त्रज्ञांची एक टीम वाराणसीतील सीवरचे नमुने गोळा करून त्यांची चाचणी करणार आहेत. या चाचणीतून विषाणूच्या आत किती प्रती आहेत हे स्पष्ट होईल. यामुळे समुदायाचा प्रसार आणि येणारा धोका शोधण्यास मदत होईल.
राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
मुंबई (Mumbai)-27
पुणे (Pune)-21
ठाणे (Thane)-12
कल्याण (Kalyan) -8
नवी मुंबई (Navi Mumbai) -4
कोल्हापूर (Kolhapur) -1
अहिल्यानगर (Ahilyanagar) -1,
रायगड (Raigad) -2