Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगटोमॅटोमध्ये आढळला जीवघेणा साल्मोनेला बॅक्टेरिया, अल्पावधित होऊ शकतो मृत्यू

टोमॅटोमध्ये आढळला जीवघेणा साल्मोनेला बॅक्टेरिया, अल्पावधित होऊ शकतो मृत्यू

आपल्या दररोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश असतो. मात्र आता याच टोमॅटोमुळे मृत्यूही होऊ शकतो. अमेरिकेतील फूट रेग्युलेटर एफडीएला टोमॅटोमध्ये साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया आढळला आहे. या बॅक्टेरियामुळे मानवाचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे टोमॅटोची एक संपूर्ण खेप परत मागवण्यात आली आहे. हा बॅक्टेरिया किती धोकादायक आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

 

टोमॅटोमध्ये साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया आढळल्याने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे. एफडीएच्या मते या बॅक्टेरियामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, तसेच यामुळे मृत्यूचा धोका देखील आहे. एफडीएने २८ मे रोजी याबाबत इशारा जारी केला आहे.

 

टोमॅटोमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया आढळल्याने टोमॅटोची एक खेप परत मागवण्यात आली आहे. हे टोमॅटो प्रामुख्याने जॉर्जिया, उत्तर कॅरोलिना आणि दक्षिण कॅरोलिना या राज्यांमधून परत मागवले गेले आहेत. त्यामुळे या टोमॅटोची आता प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. तपासणीतून सविस्तर टोमॅटोच्या धोक्याची तीव्रता समोर येणार आहे.

 

फ्रीजमध्ये हा बॅक्टेरिया अनेक महिने जिवंत राहतो

 

साल्मोनेला बॅक्टेरिया कोरड्या आणि उबदार वातावरणात काही आठवडे जिवंत राहू शकतो. तसेच हा बॅक्टेरिया फ्रीजर किंवा ओलसर ठिकाणी अनेक महिने जिवंत राहतो, त्यामुळे एफडीएने टोमॅटो फ्रीजरमध्ये न ठेवण्याचा आणि टोमॅटो परत करण्याचा सल्ला दिला आहे.

 

मृत्यूचाही धोका

 

टोमॅटोमध्ये आढळलेल्या साल्मोनेला बॅक्टेरियाच्या संसर्गाचा मूळ स्रोत अद्याप समजलेला नाही.आरोग्य विभागाच्या मते, साल्मोनेला बॅक्टेरिया सामान्य लोकांना आजारी पाडू शकतो. हा बॅक्टेरिया अन्नजन्य आजारांचे प्रमुख कारण आहे. साल्मोनेला बॅक्टेरियामुळे ताप, अतिसार, मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास जाणवतो. लहान मुले आणि वृद्ध लोक आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. या बॅक्टेरियामुळे होणाऱ्या आजारांवर वेळेत उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

 

टोमॅटो उत्पादनात अमेरिका आघाडीवर

 

अमेरिका हा जगातील सर्वात मोठ्या टोमॅटो उत्पादक देशांपैकी एक आहे. फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया राज्यांमध् टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.२०२३ मध्ये अमेरिकेत ७१.५६ कोटी डॉलर्स (सुमारे ६,१५० कोटी रुपये) किमतीचे टोमॅटोचे उत्पादन झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -