मध्य प्रदेशच्या इंदूर येथे राहाणारे राजा रघुवंशी त्यांची पत्नी सोनमसोबत मेघालयातील शिलाँगला गेले होते. त्यानंतर त्यांचे फोन स्विच ऑफ आढळले. अखेर पोलिसांना राजा रघुवंशी यांचा मृतदेह दरीत सापडला. पण त्यांची पत्नी सोनम हीचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.अखेर निराश झालेल्या सोनम यांच्या कुटुंबियांनी ज्योतिषाचा सल्ला घेतला आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी मुलीचा फोटो घराबाहेर उलटा लावला आहे.
इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यापारी राजा रघुवंशी त्यांच्या पत्नीसोबत हनीमून साजरा करण्यासाठी मेघालयातील शिलाँगला गेले होते. या कपलचे मोबाईल फोन स्विच ऑफ आल्याने घरच्यांनी काळजी वाढली. त्यानंतर घरच्यांनी पोलिस तक्रार केली. त्यानंतर तपासात राजा रघुवंशीचा मृतदेह एका दरीत सापडला. त्याने स्थानिकांकडून भाड्याने घेतलेली गाडी तुटलेल्या अवस्थेत सापडली होती. राजा रघुवंशी यांची पत्नी सोनमचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही.अखेर सोनमचे वडील देवी सिंह यांनी ज्योतीषाच्या सांगण्यावरुन तिचा फोटो घरा बाहेर उलटा टांगला आहे. ज्योतिषांचे म्हणणे आहे की अशा प्रकारे फोटो टांगल्याने हरवलेली व्यक्ती परत येते…
पतीचा मृतदेह सापडला, सोनम बेपत्ताच
सोनम रघुवंशी ही इंदूर शहरातील बाणगंगा येथील गोविंद कॉलनीत राहाते, तिचा विवाह ११ मे रोजी कॅट रोड परिसरातील रहिवासी आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्याशी हिंदू रितीरिवाजानुसार झाला होता. लग्नानंतर हे जोडपे शिलाँगला गेले होते, जिथे काही दिवसांनी त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला. त्यानंतर पोलिसांना राजा रघुवंशी याचा मृतदेह एका दरीत सापडला. त्याची निर्घृण हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह दरीत टाकून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. आता त्यांची पत्नी सोनम हीचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. तिचा शोध पोलिस घेत आहेत. अशा प्रकारे या भागात या आधीही हत्या झाल्या आहेत.
कामाख्या देवीला गेले तेव्हा कोणीतरी मागावर होते
सोनम आणि राजा यांनी १६ मे च्या सुमारास हनीमुनला जाण्याचा प्लॅन बनवला होता. सोनमचे वडील देवी सिंग यांनी सांगितले की जेव्हा त्यांचा जावई राजा आणि त्यांची मुलगी सोनम कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटी गेले होते, तेव्हा कदाचित कोणीतरी अज्ञात व्यक्ती त्यांचा पाठलाग करू लागली होती आणि दोघेही शिलाँगला पोहोचताच ते अचानक तेथून गायब झाले. यादरम्यान देवी सिंग त्यांचा मुलगा गोविंदशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोलले. गोविंद याने आम्हाला सांगितले की त्याची बहीण सोनम जीवंत आहे, परंतु शिलाँग पोलिस तिला मृत समजूनच तपास करीत आहेत असे देवी सिंह यांनी सांगितले.
दोघांचे उशीरा लग्न जुळले अन्…
सोनम हीच्या पत्रिकेत मंगळ होता. तिचे लग्न जमतच नव्हते अखेर एका मॅट्रीमोनिअल साईटवरुन राजा रघुवंशी आणि सोन यांचे नातं जुळले. राजाच्या पत्रिकेतही मंगळ होता. त्यामुळे दोघांची ग्रह शांती करण्यात आली होती. ११ मे रोजी त्यांच्या विवाह थाटात पार पडला. त्यानंतर ते लगेच इंदूरहून आघी गुवाहाटीला गेले. तेथे त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते शिलाँगला गेले आणि तेथे एक टु व्हीलर भाड्याने घेतली आणि एका जवळील पिकनिक पॉईंटवर गेले. त्यानंतर त्यांचे फोन स्विच ऑफ झाले. गाडी भाड्याने देणाऱ्या दुकानदाराला त्याची गाडी एका रस्त्यावर बेवारसपणे पडलेली आढळली….